Cheapest cashew in India : भारतातील काजूची सर्वात स्वस्त बाजारपेठ कुठे आहे ते ठाऊक आहे? हे असं ठिकाण आहे, जिथे अजून फारशा सोयी-सुविधा पोहोचलेल्या नाहीत आणि काजूशी संबंधित प्रक्रिया उद्योग उभे राहिलेले नाहीत. मात्र, या गावात प्रमुख पीक आहे, ते काजूचे!
हिवाळ्यात काजू आणि बदामांसह सुक्या मेव्यांचा वापर लक्षणीयरीत्या वाढतो. यामुळे त्यांच्या किमतीही वाढतात. साधारणपणे हिवाळ्यात काजू एक हजार रुपयांपर्यंत प्रति किलो दराने विकले जातात. हा दर सर्वांनाच परवडणारा नसतो. पण अशा वेळेस 100-200 रुपयांना पिशवीभर काजू मिळू लागले तर?
अनेकदा बाजारात आवक कमी झाल्यामुळे कांदा, बटाटा, टोमॅटोचे भाव गगनाला भिडलेले असतात. अनेकदा हे भाव 100 रुपये किलोपर्यंत पोहोचलेले असतात. अशा वेळेस या गावातल्या काजूंपेक्षा कांदा, बटाटा, टोमॅटो महाग झाले आहेत, असे म्हणावे लागते. त्यामुळे अर्थातच 100-200 रुपयांना पिशवीभर काजू मिळू शकतात. पण तुम्हाला माहिती आहे का, आपल्याच देशात असलेलं हे ठिकाण कुठे आहे ते?
हेही वाचा - राहुल द्रविडची रिक्षाचालकाशी भररस्त्यात वादावादी; कारला रिक्षाची धडक लागल्याने नाराज, VIDEO व्हायरल
देशातील सर्वात स्वस्त काजू कुठे मिळेल?
आपण ज्या ठिकाणाबद्दल बोलत आहोत ते गाव झारखंडमधील जामताडा जिल्ह्यात आहे. नाला नावाचं हे गाव आहे. इथे सुमारे 50 एकर क्षेत्रात काजूचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते. तिथे मोठ्या प्रमाणात काजूची झाडे लावण्यात आली आहेत, ज्यापासून दरवर्षी हजारो टन काजूंचे उत्पादन होते. नंतर हे काजू देशाच्या विविध भागात पुरवले जाते.
जामताडामध्ये स्वस्त काजू विकले जाण्याचे कारण
प्रत्यक्षात या गावाभोवती कोणताही प्रक्रिया उद्योग नाही. यामुळे झाडांवर वाढलेले आणि तयार झालेले काजू साठवण्यात शेतकऱ्यांना मोठी अडचण येत आहे. ते झाडावर तसेच राहू दिले तर ते खराब होण्याची शक्यता असते. यामुळे शेतकऱ्यांना काजू पिकताच तोडून लगेच विकावे लागतात.
हेही वाचा - Viral Video : टक्कल केल्यावरही किती सुंदर दिसतेय नवरी! धाडसी निर्णय घेत विग घालण्याचं टाळलं; तब्बल 4 कोटी व्ह्यूज
जामताडामध्ये काजू कसे विकले जातात?
देशभरात मोठ्या दुकानांमध्ये काजू विकले जातात. तर, जामताडामध्ये काजू भाज्यांप्रमाणे रस्त्यांवर, रेल्वे स्टेशनवर विकले जात असल्याचे दिसून येते. तिथे लोक रस्त्यावर वेगवेगळ्या ठिकाणी गाड्या उभ्या करून किंवा रेल्वे रुळांच्या आजूबाजला बसून काजू विकताना दिसतील. तिथे कच्चे काजू सुमारे 45-50 रुपयांना मिळतात आणि प्रक्रिया केलेले काजू सुमारे 150-200 रुपयांना मिळतात. घाऊक व्यापारी या ठिकाणाहून काजू खरेदी करतात आणि ते देशाच्या इतर भागात पुरवतात आणि यातून ते मोठा नफा कमावतात.
डोळे आणि मेंदूसाठी फायदेशीर
काजूचे सेवन शरीरासाठी खूप फायदेशीर मानले जाते. काजू खाल्ल्याने दृष्टी सुधारण्यास मदत होते असे म्हटले जाते. यासोबतच व्यक्तीची स्मरणशक्तीही वेगाने वाढते. आरोग्य तज्ज्ञांच्या मते, काजूमध्ये असलेले घटक मेंदू आणि डोळ्यांच्या नसा मजबूत करण्याचे काम करतात.