रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी! 10 ऑक्टोबरला दिल्लीला जाणाऱ्या रेल्वे गाड्या रद्द; पाहा रद्द गाड्यांची यादी आणि अपडेटेड वेळापत्रक

रेल्वे मंत्रालयाद्वारे उद्या 10 ऑक्टोबर रोजी दिल्लीला रवाना होणाऱ्या रद्द रेल्वे गाड्यांची यादी जाहीर; जाणून घ्या अपडेटेड वेळापत्रक..

रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी! 10 ऑक्टोबरला दिल्लीला जाणाऱ्या रेल्वे गाड्या रद्द; पाहा रद्द गाड्यांची यादी आणि अपडेटेड वेळापत्रक
IRCTC Train Cancellation List October 10

CJP चे, ज्ञानेश कुमार यांच्या विरोधातील आंदोलनातबाबाबत एक महत्व्वाची अपडेट समोर आली आहे. ते उद्या म्हणजेच 10 ऑक्टोबर रोजी जंतरमंतर येथे आंदोलन करणार असून नवी दिल्ली आणि हजरत निजामुद्दीन येथे जाणाऱ्या रेल्वे रद्द करण्यात आल्या आहेत. कारण आंदोलनादरम्यान नवी दिल्ली आणि हजरत निजामुद्दीन रेल्वे स्थानक परिसरात रस्त्यावर तीव्र वाहतूक कोंडी होती. परिणामी प्रवाशांना अशाच प्रकारच्या त्रासाला सामोरे जावे लागू नये यासाठी, रेल्वेने एक सक्रिय, खबरदारीचा उपाय म्हणून पाऊल उचलले आहे, रद्द केलेल्या रेल्वेची यादी जाहीर करण्यात आली आहे.

रेल्वे मंत्रालयालयाने दिलेल्या माहितीनुसार यावेळी आज दुपारी 2 वाजल्यापासून सुटणाऱ्या आणि उद्या 10 ऑक्टोबर रोजी पहाटे ते दुपारी चार वाजेपर्यंत पोहोचणाऱ्या सर्व मेल-एक्स्प्रेस गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. संपूर्ण देशभरातून दिल्लीत येणाऱ्या रेल्वे गाड्या या कालावधीत रद्द करण्यात आल्या आहेत. रेल्वे गाड्या रद्द केल्यानं प्रवाशांना विनंती असून त्यांनी प्रवासाचं नियोजन करावं, असे रेल्वे प्रशासनानं म्हटलं आहे.

तसेच यापूर्वीच्या आंदोलनामुळे प्रचंड गर्दी आणि रस्ते अडवल्यामुळे सुमारे 5,000 प्रवाशांच्या गाड्या चुकल्या होत्या. त्यामुळे या पार्श्वभूमीवर शनिवारी पहाटे 4 ते दुपारी 2 वाजेपर्यंत सर्व मेल आणि एक्सप्रेस रेल्वे सेवा रद्द राहतील. मात्र प्रवाशांच्या खोळंबा होऊ नये म्हणून राष्ट्रीय राजधानीतील आनंद विहार, दिल्ली जंक्शन, दिल्ली सराय रोहिल्ला (डीईई) यांसारखी इतर स्थानके खुली राहतील.

जाणून घ्या रद्द झालेल्या गाड्यांची यादी

एनसीआर ट्रेन्स
12033 कानपूर सेंट्रल – नवी दिल्ली शताब्दी एक्सप्रेस 10 ऑक्टोबर
12417 प्रयागराज – नवी दिल्ली प्रयागराज एक्सप्रेस 9 ऑक्टोबर
12275 प्रयागराज – नवी दिल्ली हमसफर एक्सप्रेस 9 ऑक्टोबर
12451 कानपूर सेंट्रल – नवी दिल्ली श्रमशक्ती एक्सप्रेस 9 ऑक्टोबर
12447 माणिकपूर – हजरत निजामुद्दीन यूपी संपर्क क्रांती एक्सप्रेस 9 ऑक्टोबर
14211 आग्रा कँट – नवी दिल्ली इंटरसिटी एक्सप्रेस 10 ऑक्टोबर
64151 अलीगढ – दिल्ली मेमू 9 ऑक्टोबर
64107 दनकौर – दिल्ली EMU 9 ऑक्टोबर
64113 खुर्जा – गाझियाबाद ईएमयू 9 ऑक्टोबर
64101 अलीगढ – दिल्ली EMU ऑक्टोबर 10
64111 खुर्जा – शकूरबस्ती ईएमयू 10 ऑक्टोबर
64581 हाथरस किल्ला – दिल्ली एमईएमयू 10 ऑक्टोबर
64103 अलीगढ – दिल्ली ईएमयू 10 ऑक्टोबर
64583 टुंडला – दिल्ली एमईएमयू 10 ऑक्टोबर
64105 अलीगढ – नवी दिल्ली ईएमयू 10 ऑक्टोबर
64109 डंकौर – शकूरबस्ती ईएमयू 10 ऑक्टोबर

हेही वाचा – मंत्रालयातील उच्चपदस्थ महिला अधिकाऱ्याला मॅट्रिमोनिअल साईटवरून 18 लाखांचा गंडा; भामट्यांविरोधात गुन्हा दाखल

एनआर ट्रेन्स:
12229 लखनौ मेल 9 ऑक्टोबर
12429 लखनौ-नवी दिल्ली एसी स्पेशल 9 ऑक्टोबर

एनईआर ट्रेन्स:
82501 तेजस एक्सप्रेस 10 ऑक्टोबर
12559 शिव गंगा एक्सप्रेस 9 ऑक्टोबर
12581 बनारस-नवी दिल्ली सुपरफास्ट एक्सप्रेस 9 ऑक्टोबर
15303 कासगंज-नवी दिल्ली इंटरसिटी एक्सप्रेस 10 ऑक्टोबर

पश्चिम आणि मध्य रेल्वेने लांब पल्ल्याच्या गाड्या रद्द आणि पुनर्निर्धारित –
पश्चिम आणि मध्य रेल्वेने सहा लांब पल्ल्याच्या गाड्या देखील रद्द केल्या आहेत. रेल्वे बोर्डाने मुंबईतील रेल्वे प्रशासनाला दिलेल्या माहितीनुसार, नवी दिल्ली आणि हजरत निजामुद्दीन येथील रेल्वे स्थानकांच्या आसपासच्या भागांमध्ये अपेक्षित असलेल्या रस्ते वाहतूक कोंडीच्या पार्श्वभूमीवर निर्बंध लादण्यात आले आहेत.
मुंबई राजधानी गाड्यांचे वेळापत्रक 5 तासांनी पुढे ढकलले

शनिवारी सकाळी 8.32 वाजता नवी दिल्लीला पोहोचणारी मुंबई सेंट्रल–नवी दिल्ली राजधानी एक्सप्रेस (12951)
सकाळी 9.43 वाजता पोहोचणारी मुंबई सेंट्रल–हजरत निजामुद्दीन राजधानी एक्सप्रेस (12953)
या दोन राजधानी गाड्यांचे वेळापत्रक पाच तासांनी पुढे ढकलण्यात आले आहे. मध्य रेल्वे प्रशासनाने सीएसएमटी ते हजरत निजामुद्दीन राजधानी दरम्यान धावणारी ट्रेन 22221 रद्द केली आहे.

रद्द करण्यात आलेल्या इतर पाच गाड्यांमध्ये डॉ. आंबेडकर नगर – नवी दिल्ली एक्सप्रेस (20155), इंदूर – हजरत निजामुद्दीन एक्सप्रेस (09309), इंदूर–नवी दिल्ली एक्सप्रेस (12415), वांद्रे टर्मिनस–हजरत निजामुद्दीन एक्सप्रेस (12247) आणि साबरमती–नवी दिल्ली एक्सप्रेस (12957) यांचा समावेश आहे.

Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number