Reliance Consumer Products: मुकेश अंबानी यांच्या मालकीच्या रिलायन्स कंझ्युमर प्रॉडक्ट्स लिमिटेड (आरसीपीएल) ने अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालयासोबत देशभरात एकात्मिक अन्न उत्पादन सुविधा उभारण्यासाठी 40,000 कोटी रुपयांचा करार केला आहे. हा करार वर्ल्ड फूड इंडिया 2025 कार्यक्रमादरम्यान सादर करण्यात आला.
वेगाने वाढणारी ग्राहक कंपनी
आरसीपीएल ही रिलायन्स इंडस्ट्रीजची उपकंपनी असून, भारतातील दैनंदिन घरगुती वस्तूंच्या उत्पादनात सर्वात वेगाने वाढणाऱ्या कंपन्यांपैकी एक मानली जाते. फक्त तीन वर्षांच्या स्थापनेनंतर, कंपनीने 11,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त महसूल कमावला आहे. ऑगस्टमध्ये झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत रिलायन्स इंडस्ट्रीजने एआय-संचालित ऑटोमेशन, रोबोटिक्स आणि शाश्वत तंत्रज्ञानासह आशियातील सर्वात मोठा एकात्मिक फूड पार्क उभारण्याची योजना जाहीर केली होती.
हेही वाचा - Cabinet Decision : जहाजबांधणी उद्योगाला मोठी चालना! केंद्र सरकारने 70 हजार कोटींच्या पॅकेजला दिली मंजुरी
गुंतवणूक आणि सुविधा ठिकाणे
दरम्यान, गुरुवारी झालेल्या करारानुसार, आरसीपीएल महाराष्ट्रातील काटोल आणि नागपूर तसेच आंध्र प्रदेशातील कुर्नूल येथे अन्न उत्पादने आणि पेय पदार्थांसाठी एकात्मिक सुविधा उभारण्यासाठी 1,500 कोटींपेक्षा जास्त गुंतवणूक करणार आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजच्या संचालक ईशा अंबानी यांनी या वर्षाच्या वार्षिक सभेत सांगितले की, आरसीपीएल समूहाच्या वाढीच्या इंजिनांपैकी एक आहे. त्यामुळे यातून पाच वर्षांत जागतिक स्तरावर 1 लाख कोटींचे उत्पन्न मिळवण्याचे लक्ष्य आहे.
हेही वाचा - 8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! दिवाळीपूर्वी 3 मोठ्या भेटवस्तू मिळण्याची शक्यता
आरसीपीएलचे प्रमुख ब्रँड
आरसीपीएलने टॅग फूड्ससह अनेक ग्राहक ब्रँड खरेदी केले आहेत. कंपनीने साबणांपासून कोला पर्यंत अनेक देशांतर्गत ब्रँड सादर केले आहेत, ज्यात कॅम्पा, इंडिपेंडन्स, एलान, एन्झो आणि रावळगाव यांचा समावेश आहे.