LPG Cylinder Crisis: ‘काळाबाजार रोखण्यासाठीच व्यावसायिक सिलेंडरवर निर्बंध…’; पेट्रोलियम मंत्री हरदीप पुरी यांचं संसदेत स्पष्टीकरण

गेल्या 5 दिवसांत एलपीजी उत्पादनात 28 टक्के वाढ झाली असून, पेट्रोल आणि डिझेलचाही कोणताही तुटवडा नसल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले.

LPG Cylinder Crisis: ‘काळाबाजार रोखण्यासाठीच व्यावसायिक सिलेंडरवर निर्बंध…’; पेट्रोलियम मंत्री हरदीप पुरी यांचं संसदेत स्पष्टीकरण

LPG Cylinder Crisis: देशात निर्माण झालेल्या कथित एलपीजी (LPG) संकटावर पेट्रोलियम मंत्री हरदीप पुरी यांनी आज लोकसभेत सरकारची बाजू स्पष्ट केली. गेल्या 5 दिवसांत एलपीजी उत्पादनात 28 टक्के वाढ झाली असून, पेट्रोल आणि डिझेलचाही कोणताही तुटवडा नसल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले. व्यावसायिक सिलेंडर्सच्या वापरावर घालण्यात आलेले निर्बंध हे केवळ काळाबाजार रोखण्यासाठीच असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

विरोधकांचे निदर्शन आणि राहुल गांधींचे चर्चेचे आवाहन
संसदेच्या आजच्या सत्रात विरोधी पक्षांच्या खासदारांनी गॅस संकटाच्या मुद्द्यावरून जोरदार निदर्शने केली. सरकार इंधन साठ्याबाबत जनतेची दिशाभूल करत असल्याचा आरोप विरोधकांनी केला. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी या विषयावर तातडीने चर्चा करण्याची सूचना मांडली, जी संसदेने मान्य केली. चर्चेची सुरुवात करताना राहुल गांधी यांनी सरकारला वाढत्या टंचाईवर ठोस उपाययोजना करण्याची विनंती केली.

इराण-इस्रायल युद्धाच्या सावटातही इंधन पुरवठा सुरक्षित
मध्य पूर्वेतील इराण आणि इस्रायलमधील युद्धामुळे जागतिक पातळीवर चिंतेचे वातावरण असताना भारताने आपल्या इंधन सुरक्षेबाबत मोठे विधान केले आहे. हरदीप पुरी म्हणाले, “देशातील कच्च्या तेलाचा आणि गॅसचा पुरवठा पूर्णपणे सुरक्षित आहे. LNG चे 2 कार्गो (जहाजे) भारताकडे रवाना झाले असून ते लवकरच बंदरात पोहोचतील. त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाण्याचे कारण नाही.”

हेही वाचा – Iran-US Conflict: ‘इराणी बेटांवर हल्ला केला तर पर्शियन आखातात…’; अमेरिकेच्या इशाऱ्याला इराणचे चोख प्रत्युत्तर

साठेबाजी करणाऱ्यांवर कारवाई; ‘पॅनिक बुकिंग’ टाळण्याचे आवाहन
देशातील विविध शहरांमध्ये गॅस एजन्सीबाहेर सिलिंडरसाठी लांब रांगा लागल्याचे चित्र दिसत आहे. या पार्श्वभूमीवर पेट्रोलियम मंत्रालयाने जनतेला ‘पॅनिक बुकिंग’ न करण्याचे आवाहन केले आहे. अनेक नागरिक भविष्यातील टंचाईच्या भीतीने सिलिंडर साठवून ठेवत असल्याने परिस्थिती अधिक गंभीर होत आहे. “साठेबाजी करणाऱ्यांविरुद्ध कडक कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. पुरवठा साखळी सुरळीत असून सर्वांना वेळेत गॅस मिळेल,” असे आश्वासन सरकारने दिले आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number