नवी दिल्ली: फास्टॅगबाबत अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. केंद्र सरकार 15 ऑगस्टपासून FASTag चे नियम बदलणार आहे. सरकारच्या या उपक्रमांतर्गत, 15 ऑगस्ट 2025 पासून 3 हजार रुपयांचा FASTag आधारित वार्षिक पास सुरू केला जात आहे. हा पास सक्रिय झाल्याच्या तारखेपासून एक वर्षासाठी किंवा 200 फेऱ्यांपर्यंत, जे आधी असेल ते वैध असेल. रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर याबाबत माहिती दिली आहे. हा पास विशेषतः केवळ गैर-व्यावसायिक खाजगी वाहनांसाठी (कार, जीप, व्हॅन इ.) डिझाइन करण्यात आला आहे. यामुळे देशभरातील राष्ट्रीय महामार्गांवर अखंड प्रवास शक्य होईल.
नितीन गडकरी यांनी सांगितलं आहे की, वार्षिक पास सक्रिय करण्यासाठी किंवा नूतनीकरण करण्यासाठी लवकरच हायवे ट्रॅव्हल अॅप आणि NHAI/MoRTH वेबसाइटवर एक वेगळी लिंक उपलब्ध करून दिली जाईल, ज्यामुळे प्रक्रिया सोपी आणि सुरळीत होईल. हे धोरण 60 किमीच्या परिघात असलेल्या टोल प्लाझांबद्दलच्या दीर्घकालीन चिंता दूर करेल. तलेच एकाच सोप्या व्यवहाराद्वारे टोल पेमेंट सुलभ करेल.
हेही वाचा - दलालांपासून सावध रहा..! EPFO सदस्यांना इशारा; 'या' सेवा सेवांसाठी कोणतेही शुल्क आकारले जात नाही
फास्टॅगसंदर्भातील या बदलाचा सर्वसामान्यांना मोठा फायदा मिळणार आहे. फास्टॅग वापरल्यानंतर, ग्राहकाला त्याच्या टॅग खात्यात केलेल्या सर्व व्यवहारांसाठी त्याच्या नोंदणीकृत मोबाइल नंबरवर एसएमएस अलर्ट मिळतो. तथापी, ग्राहकाला टोल पेमेंटसाठी रोख रक्कम बाळगण्याची चिंता करण्याची गरज नाही.
हेही वाचा - आता UPI द्वारे फक्त 10 सेकंदात होणार पेमेंट! सरकारने लागून केले नवीन नियम
ग्राहक डेबिट कार्ड किंवा नेट बँकिंगद्वारे त्यांचे टॅग खाते ऑनलाइन रिचार्ज करू शकतात. याशिवाय, ग्राहक FASTag ग्राहक पोर्टलवर लॉग इन करून त्यांचे स्टेटमेंट पाहू शकतात.