Friday, March 13, 2026 11:12:08 PM

Shikhar Dhawan Wedding: शिखर धवन पुन्हा चढला बोहल्यावर; आयर्लंडच्या सोफी शाइनशी बांधली लग्नगाठ

वयाच्या 40 व्या वर्षी शिखरने हे दुसरे लग्न केले असून सध्या सोशल मीडियावर त्यांच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहेत.

shikhar dhawan wedding शिखर धवन पुन्हा चढला बोहल्यावर आयर्लंडच्या सोफी शाइनशी बांधली लग्नगाठ

Shikhar Dhawan Wedding: भारतीय क्रिकेट संघाचा माजी धडाकेबाज सलामीवीर शिखर धवनने त्याच्या आयुष्याची नवीन इनिंग सुरू केली आहे. धवनने त्याची दीर्घकाळाची प्रेयसी सोफी शाइन (Sophie Shine) हिच्याशी विवाह केला आहे. वयाच्या 40 व्या वर्षी शिखरने हे दुसरे लग्न केले असून सध्या सोशल मीडियावर त्यांच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहेत. गेल्या काही दिवसांपासून या जोडप्याच्या संगीत, मेहंदी आणि हळदी समारंभांच्या फोटोंनी इंटरनेटवर अक्षरशः धुमाकूळ घातला होता.

चहलचा जबरदस्त डान्स
शिखर धवन आणि सोफी शाइनच्या या शाही विवाह सोहळ्याला क्रिकेट जगतातील अनेक दिग्गज उपस्थित होते. यामध्ये शिखरचा जवळचा मित्र आणि स्टार स्पिनर युजवेंद्र चहलने विशेष लक्ष वेधून घेतले. चहलने इंस्टाग्रामवर या नवविवाहित जोडप्याचे सुंदर फोटो शेअर केले आहेत. इतकेच नाही तर, एका व्हिडिओमध्ये चहल आपल्या मित्राच्या लग्नात मनसोक्त नाचताना दिसत आहे. "माझा मित्र लग्न करत आहे," असे भावनिक कॅप्शन लिहित चहलने धवनला शुभेच्छा दिल्या आहेत.

कोण आहे सोफी शाइन?
सोफी शाइन ही मूळची आयर्लंडची रहिवासी असून ती व्यवसायाने एक 'उत्पादन सल्लागार' (Production Consultant) आहे. सोफी शिखर धवनपेक्षा सुमारे 5 वर्षांनी लहान आहे. हे दोघेही बऱ्याच काळापासून एकमेकांना डेट करत होते. विशेष म्हणजे, सोफीने लग्नाच्या सर्व भारतीय विधींमध्ये उत्साहाने सहभाग घेतला. हळदी आणि मेहंदी समारंभासह मुख्य लग्नासाठी तिने परिधान केलेल्या भारतीय लेहेंग्यातील लूकची सध्या सर्वत्र चर्चा होत आहे.

हेही वाचा - IND W vs AUS W 3rd T20I: टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय! ऑस्ट्रेलियाचा 17 धावांनी पराभव करत जिंकली टी-20 मालिका

2012 मध्ये झाले होते पहिले लग्न
शिखर धवनचे हे दुसरे लग्न आहे. यापूर्वी 2012 मध्ये त्याने ऑस्ट्रेलियन वंशाच्या आयेशा मुखर्जीशी लग्न केले होते. आयेशा शिखरपेक्षा 10 वर्षांनी मोठी होती. या दांपत्याला 'जोरावर' नावाचा एक मुलगा आहे. मात्र, काही कारणास्तव 2023 मध्ये त्यांचा कायदेशीर घटस्फोट झाला. आता जुन्या आठवणींना मागे सारत धवनने सोफीसोबत नवीन आयुष्याची सुरुवात केली असून क्रिकेट चाहते आणि मित्रपरिवार त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत.


सम्बन्धित सामग्री