Wednesday, November 19, 2025 01:08:07 PM

IPS Officer Y Puran Kumar: धक्कादायक! चंदीगडमध्ये हरियाणा केडरच्या वरिष्ठ IPS अधिकाऱ्याने स्वतःवर गोळी झाडून संपवलं जीवन

त्यांच्या या टोकाच्या निर्णयामागील कारण अद्याप अधिकृतपणे स्पष्ट झालेले नाही. या घटनेची माहिती मिळताच चंदीगड पोलीस आणि हरियाणा पोलीस अधिकारी घटनास्थळी पोहोचले आहेत.

ips officer y puran kumar धक्कादायक चंदीगडमध्ये हरियाणा केडरच्या वरिष्ठ ips अधिकाऱ्याने स्वतःवर गोळी झाडून संपवलं जीवन

IPS Officer Y Puran Kumar: हरियाणा कॅडरच्या वरिष्ठ आयपीएस अधिकारी वाय. पुरण कुमार यांनी चंदीगडमधील त्यांच्या खाजगी निवासस्थानी स्वतःवर गोळी झाडून आपली जीवनयात्रा संपवली. त्यांच्या या टोकाच्या निर्णयामागील कारण अद्याप अधिकृतपणे स्पष्ट झालेले नाही. या घटनेची माहिती मिळताच चंदीगड पोलीस आणि हरियाणा पोलीस अधिकारी घटनास्थळी पोहोचले आहेत.

मृताची पत्नी आयएएस अधिकारी  

प्राप्त माहितीनुसार, मृत अधिकारी वाय. पुरण कुमार यांच्या पत्नी आयएएस अधिकारी आहेत. त्या 5 ऑक्टोबर रोजी जपान दौऱ्यावर मुख्यमंत्री नायब सिंह सैनी आणि इतर अधिकाऱ्यांसोबत गेल्या होत्या. त्या उद्या संध्याकाळी भारतात परणार आहेत. 

हेही वाचा - Shocking Crime : डोक्यात गेला.. विषय संपला! लग्नाला नकार देणाऱ्या प्रियकराची गर्भवती प्रेयसीने केली निर्घृण हत्या

मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला

प्राथमिक माहितीनुसार, पोलिसांनी मृत अधिकाऱ्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला असून, तपासाची दिशा निश्चित करण्यासाठी सीसीटीव्ही फुटेजची तपासणी सुरू केली आहे. मृत्यूमागील कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही, मात्र पोलीस सर्व शक्य त्या दृष्टीकोनातून चौकशी करत आहेत. या प्रकरणाच्या हाय-प्रोफाइल स्वरूपामुळे तपास अत्यंत सावधगिरीने केला जात आहे.

हेही वाचा - Uttar Pradesh Crime: पाचवे लग्न करणार म्हणून मुलाकडून वडिलांचा खून, पोलिसांनी केला धक्कादायक खुलासा

वाय. पुरण कुमार कोण होते? 

वाय. पुरण कुमार हे 2001 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. त्यांना त्यांच्या प्रामाणिकपणा आणि कार्यनिष्ठेसाठी ओळखले जात होते. त्यांच्या निधनाने पोलीस विभागात शोकांतिका पसरली आहे. अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्यांच्या मृत्यूबद्दल शोक व्यक्त केला आहे.

अफवांकडे दुर्लक्ष करण्याचे आवाहन

या घटनेनंतर काही अफवा पसरत असल्याचे दिसत असून, पोलीस आणि प्रशासनाने जनतेला अफवांकडे दुर्लक्ष करण्याचे आणि अधिकृत माहितीवरचं विश्वास ठेवण्याचे आवाहन केले आहे. पुढील चौकशीनंतरच या मृत्यूमागील नेमके कारण स्पष्ट होईल, असे पोलीस सूत्रांनी सांगितले.


सम्बन्धित सामग्री