Technical Glitch On SpiceJet Flight: दिल्लीहून पटनाकडे जाणाऱ्या स्पाइसजेटच्या विमानात गुरुवारी सकाळी तांत्रिक बिघाड झाल्याची घटना समोर आली आहे. उड्डाणानंतर थोड्याच वेळात पायलटला तांत्रिक अडचणींची चिन्हं दिसल्याने विमान तत्काळ दिल्ली विमानतळावर परत आणण्यात आलं.
स्पाइसजेट एअरलाइन्सने दिलेल्या माहितीनुसार, संबंधित विमान बोईंग 737-8A मॉडेलचं असून, प्रवाशांच्या सुरक्षेला प्राधान्य देत हा निर्णय घेण्यात आला. विमानाची तात्काळ ग्राउंडिंग करून सखोल तपासणी सुरू करण्यात आली आहे. दरम्यान, या तांत्रिक बिघाडामुळे प्रवाशांमध्ये काही वेळेसाठी घबराट निर्माण झाली होती. मात्र, विमान सुरक्षितपणे दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरवण्यात आलं. सध्या सर्व प्रवासी सुरक्षित आहेत.
हेही वाचा - Bihar Election 2025: इंडिया आघाडीची मोठी घोषणा; तेजस्वी यादव मुख्यमंत्रीपदाचे ठरले उमेदवार
एअरलाइन्सने सांगितलं की, पटना मार्गासाठी दुसऱ्या विमानाची व्यवस्था केली जात आहे. प्रवाशांना शक्य तितकी सोय उपलब्ध करून देण्यात येत असल्याचं स्पाइसजेटकडून सांगण्यात आलं आहे.