Ahmedabad Plane Crash Update: अहमदाबाद येथील विमान अपघाताने संपूर्ण देशात खळबळ उडाली आहे. या विमानातील केवळ एका प्रवाशाचा जीव वाचला असून इतर सर्वांचा मृत्यू झाला आहे. टाटा सन्सचे अध्यक्ष एन चंद्रशेखरन यांनी बुधवारी अहमदाबादमध्ये झालेल्या एअर इंडिया विमान अपघातातील प्रत्येक बळींच्या कुटुंबियांना 1 कोटी रुपयांची भरपाई जाहीर केली. चंद्रशेखरन यांनी इंस्टाग्रामवरील पोस्टमध्ये म्हटले आहे की, आम्हाला खूप दुःख झाले आहे. यावेळी आम्हाला जे दुःख होत आहे ते शब्दात व्यक्त करता येणार नाही. ज्या कुटुंबांनी आपले प्रियजन गमावले आहेत त्यांच्यासाठी आणि या अपघातात जखमी झालेल्यांसोबत आमच्या संवेदना आणि प्रार्थना आहेत.
हेही वाचा - विमान अपघातामुळे किती कोटी रुपयांचे नुकसान होते? आकडा ऐकून व्हाल अवाक!
जखमींच्या उपचाराचा सर्व खर्च आम्ही उचलू आणि त्यांना आवश्यक ती सर्व काळजी आणि मदत मिळेल याची खात्री करतो. याशिवाय, आम्ही बीजे मेडिकलच्या वसतिगृहाच्या बांधकामात मदत करू, असं आश्वासनही यावेळी चंद्रशेखरन यांनी दिलं आहे. तसेच आजचा दिवस माझ्या व्यावसायिक कारकिर्दीतील सर्वात वाईट दिवस असल्याचंही त्यांनी नमूद केलं आहे.
हेही वाचा - चरखी दादरी अपघातानंतर अहमदाबादमधील विमान अपघात ठरला देशातील सर्वात मोठा विमान अपघात
दरम्यान, गुरुवारी दुपारी 230 प्रवासी आणि 12 क्रू सदस्यांना घेऊन जाणारे एअर इंडियाचे विमान टेकऑफ केल्यानंतर काही सेकंदातच अहमदाबादमधील एका मेडिकल कॉलेजच्या वसतिगृहात कोसळले. माहितीनुसार, या अपघातात एका व्यक्तीशिवाय विमानातील सर्व लोकांचा मृत्यू झाला आहे. एअर इंडियाने दिलेल्या माहितीनुसार, विमानात एकूण 230 प्रवासी होते, ज्यात 169 भारतीय, 53 ब्रिटिश, सात पोर्तुगीज आणि एक कॅनेडियन नागरिक होता.