Monday, November 17, 2025 06:26:41 AM

Bihar Train Accident: पूर्णियामध्ये भीषण अपघात! वंदे भारत ट्रेनच्या धडकेत 4 जणांचा मृत्यू

जोगबनीहून पाटलीपुत्रकडे धावणाऱ्या हायस्पीड वंदे भारत ट्रेनची शहराजवळील रेल्वे क्रॉसिंगवर काही तरुणांना जोरदार धडक बसली.

bihar train accident पूर्णियामध्ये भीषण अपघात वंदे भारत ट्रेनच्या धडकेत 4 जणांचा मृत्यू

Bihar Train Accident: बिहारमधील पूर्णिया शहरात आज पहाटेच्या सुमारास मोठा रेल्वे अपघात घडला. जोगबनीहून पाटलीपुत्रकडे धावणाऱ्या हायस्पीड वंदे भारत ट्रेनची शहराजवळील रेल्वे क्रॉसिंगवर काही तरुणांना जोरदार धडक बसली. या भीषण अपघातात चार जणांचा मृत्यू झाला असून, काही जण जखमी झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, मृत तरुणांचे वय 18 ते 25 वर्षांच्या दरम्यान आहे. अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला, तर चौथ्या तरुणाने जीएमसीएच रुग्णालयात उपचारादरम्यान प्राण गमावले. जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

हेही वाचा - India-China Air Services : भारत आणि चीनमधील विमानसेवा 'या' तारखेपासून पुन्हा होणार सुरु; परराष्ट्र मंत्रालयाची घोषणा

हा अपघात पहाटे अंदाजे 5 वाजता घडला. दरम्यान, दुर्गा मेळ्यातील सांस्कृतिक कार्यक्रम आटोपून काही तरुण परतत होते. याचवेळी ते क्रॉसिंग ओलांडत असताना वंदे भारत ट्रेनची धडक बसली. अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. क्रॉसिंग कर्मचाऱ्यांची निष्काळजीपणा की तरुणांनी हायस्पीड ट्रेनकडे दुर्लक्ष केले, याची चौकशी सुरू आहे. रेल्वे पोलीसांनी मृतदेह ताब्यात घेऊन तपास सुरू केला आहे.

हेही वाचा - RBI Survey : घरांवरील महागाईचा ताण होणार कमी; RBI सर्वेक्षणातून सकारात्मक संकेत

अपघातानंतर रेल्वे आणि प्रशासनाचे वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून, घटनेची चौकशी सुरू आहे. जोगबनी–पाटलीपुत्र दरम्यान धावणारी वंदे भारत ट्रेन ही ताशी सुमारे 130 किमी वेगाने धावते. त्यामुळे स्थानिकांना ट्रेनजवळील परिसरात विशेष सतर्कता बाळगण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
 


सम्बन्धित सामग्री