Rajasthan Shahbaz Horse: राजस्थानमधील अजमेर जिल्ह्यातील प्रसिद्ध पुष्कर पशु मेळ्यात यंदा एका घोड्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. ‘शाहबाज’ असं या काळ्या घोड्याचं नाव असून त्याची किंमत 15 कोटी रुपये असल्याचं सांगण्यात येत आहे. चंदीगडचे गॅरी गिल या घोड्याचे मालक असून, त्यांनी यावर्षी 40 हून अधिक घोडे मेळ्यात आणले आहेत. पण सर्वांचे लक्ष मात्र ‘शाहबाज’वरच होते. अवघ्या अडीच वर्षांच्या वयात या घोड्याने सहा राष्ट्रीय स्तरावरील शो जिंकले आहेत. तसेच हा घोडा प्रत्येक ठिकाणी ट्रॉफी घेऊन परतला आहे.
गिलच्या मते, या घोड्याने आतापर्यंत पाच ते सहा प्रमुख शो जिंकले आहेत. गेल्या वर्षी, पंजाबमध्ये झालेल्या तीन प्रमुख स्पर्धांमध्ये शाहबाजने प्रथम क्रमांक पटकावला आणि एका स्पर्धेत दुसरा क्रमांक पटकावला. त्यांच्या मालकाने सांगितलं की, त्याने खूप कमी शोमध्ये भाग घेतला आहे, परंतु तो जिथे जिथे गेला तिथे तो ट्रॉफी घेऊन परतला आहे.
हेही वाचा - हो, हे खरंय! 'या' देशाच्या मंत्री एकाचवेळी देणार 83 बाळांना जन्म; कसं? वाचा सविस्तर
शाहबाजची वैशिष्ट्ये
शाहबाजची उंची 65.5 इंच आहे. त्याची कव्हरिंग फी किंवा प्रजनन फी 2 लाख निश्चित केली आहे. गॅरी गिल यांनी सांगितलं की, सध्या शाहबाजला विकण्याचा त्याचा कोणताही हेतू नाही. आतापर्यंत, त्याला 9 कोटींपर्यंतच्या ऑफर मिळाल्या आहेत. शाहबाजची पुढची पिढी मजबूत होईपर्यंत मी शाहबाजला विकण्याचा विचार करणार नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे. शाहबाजसोबत गॅरीने त्यांचे इतर प्रसिद्ध घोडे, दबंग, भारत ध्वज आणि नागेश्वर देखील आणले आहेत, जे मेळ्याच्या परिसरात आकर्षणाचे केंद्र आहेत.
हेही वाचा - Man Becomes Billionaire in Minutes: काय सांगता!! काही मिनिटांत तरुण बनला अब्जाधीश! खात्यात अचानक जमा झाले 2800 कोटी
या वर्षी मेळ्यात आतापर्यंत 32021 प्राण्यांची नोंदणी झाली आहे. यामध्ये 2102 घोडे, 117 उंट, आणि काही गायी-म्हशींचा समावेश आहे. उंट, घोडे आणि इतर प्राण्यांच्या व्यापारासाठी प्रसिद्ध असलेल्या या मेळ्यात, यंदा ‘शाहबाज’च्या आगमनाने वैभव अधिकच वाढले आहे. त्याची चमकदार काळी त्वचा, भव्य उंची लोकांना आकर्षित करत आहे.