LPG Production: LPG उत्पादनात ‘हा’ देश आघाडीवर; जाणून घ्या तुमच्या स्वयंपाकघरातील गॅस नेमका कसा तयार होतो

या संघर्षाचा थेट परिणाम एलपीजी (LPG) पुरवठ्यावर होत असून भारतासह अनेक देशांमध्ये गॅस सिलिंडरचा तुटवडा जाणवू लागला आहे.

LPG Production: LPG उत्पादनात ‘हा’ देश आघाडीवर; जाणून घ्या तुमच्या स्वयंपाकघरातील गॅस नेमका कसा तयार होतो

LPG Production: मध्य पूर्वेतील वाढत्या तणावामुळे जागतिक ऊर्जा बाजारपेठेत चिंतेचे वातावरण आहे. या संघर्षाचा थेट परिणाम एलपीजी (LPG) पुरवठ्यावर होत असून भारतासह अनेक देशांमध्ये गॅस सिलिंडरचा तुटवडा जाणवू लागला आहे. या संकटकाळात, 'स्वयंपाकाचा गॅस कसा तयार होतो' आणि 'जगातील सर्वात मोठा उत्पादक देश कोणता' या प्रश्नांची चर्चा रंगू लागली आहे. आखाती देशांमधील पुरवठा विस्कळीत झाल्याने जागतिक बाजारपेठेत अस्थिरता निर्माण झाली असून सामान्य माणसाच्या बजेटवर त्याचे सावट आहे.

अमेरिका आहे गॅस उत्पादनाचा 'निर्विवाद राजा'
अनेकांना वाटत असेल की आखाती देश यात आघाडीवर आहेत, मात्र वस्तुस्थिती वेगळी आहे. अमेरिका हा जगातील सर्वात मोठा एलपीजी उत्पादक देश आहे. कच्च्या तेलाचे शुद्धीकरण (Refining) आणि नैसर्गिक वायूच्या प्रक्रियेदरम्यान एलपीजी प्रामुख्याने एक उप-उत्पादन (By-product) म्हणून तयार होतो. अमेरिकेकडे असलेले प्रगत तंत्रज्ञान आणि विशाल रिफायनरी नेटवर्कमुळे ते जगाच्या मोठ्या भागाला गॅसचा पुरवठा करतात. सध्याच्या युद्धजन्य परिस्थितीत अमेरिकेची भूमिका जागतिक ऊर्जा सुरक्षेसाठी अत्यंत महत्त्वाची ठरत आहे.

एलपीजी निर्मितीचे शास्त्र: प्रोपेन आणि ब्युटेनचा संगम
एलपीजी (Liquefied Petroleum Gas) प्रामुख्याने प्रोपेन आणि ब्युटेन या दोन वायूंच्या मिश्रणातून तयार होतो. जेव्हा रिफायनरीमध्ये कच्च्या तेलाला उच्च तापमानावर तापवले जाते, तेव्हा वेगवेगळ्या टप्प्यांवर विविध इंधने आणि वायू मिळतात. या प्रक्रियेतून प्रोपेन आणि ब्युटेन वेगळे केले जातात. या वायूंवर उच्च दाब (High Pressure) देऊन त्यांचे द्रव स्वरूपात रूपांतर केले जाते, म्हणूनच याला 'द्रवीकृत पेट्रोलियम वायू' असे म्हटले जाते.

हेही वाचा – India Energy Crisis: ऊर्जा संकटाच्या पार्श्वभूमीवर भारताला दिलासा; ‘या’ देशाने दिली LNG पुरवठ्याची ऑफर

उच्च दाब आणि साठवणुकीचे तंत्रज्ञान
वायूंचे द्रवात रूपांतर करण्याची प्रक्रिया तांत्रिकदृष्ट्या गुंतागुंतीची असते. उच्च दाब दिल्याने वायू द्रवरूप होतो, ज्यामुळे कमी जागेत जास्त प्रमाणात गॅस साठवणे आणि त्याची वाहतूक करणे सोपे होते. सिलिंडरच्या आत हा गॅस द्रव स्वरूपात असतो, परंतु जेव्हा आपण गॅस शेगडीचा नॉब फिरवतो आणि रेगुलेटरद्वारे तो बाहेर येतो, तेव्हा दाब कमी झाल्यामुळे त्याचे पुन्हा वायूत रूपांतर होते. मध्य पूर्वेतील सध्याची अस्थिरता पाहता, भारत आता आपली साठवण क्षमता वाढवण्यावर आणि नवीन ऊर्जा पर्यायांवर भर देत आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number