Bihar Election 2025: समस्तीपूरमध्ये कचऱ्यात सापडल्या हजारो VVPAT स्लिप्स; 2 अधिकारी निलंबित, FIR दाखल

राष्ट्रीय जनता दलाने (RJD) याचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला असून, व्हिडिओमध्ये केएसआर कॉलेजजवळ रस्त्याच्या कडेला फेकलेल्या व्हीव्हीपॅट स्लिप्स स्पष्ट दिसत आहेत.

Bihar Election 2025: समस्तीपूरमध्ये कचऱ्यात सापडल्या हजारो VVPAT स्लिप्स; 2 अधिकारी निलंबित, FIR दाखल

Bihar Election 2025: बिहारच्या समस्तीपूर जिल्ह्यातील सराईरंजन विधानसभा मतदारसंघातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे शीतलपट्टी गावाजवळ कचऱ्याच्या ढिगाऱ्यात हजारो व्हीव्हीपॅट (VVPAT) स्लिप्स सापडल्याने निवडणूक आयोगाच्या कार्यप्रणालीवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. ही घटना उघडकीस आल्यानंतर परिसरात खळबळ उडाली. राष्ट्रीय जनता दलाने (RJD) याचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला असून, व्हिडिओमध्ये केएसआर कॉलेजजवळ रस्त्याच्या कडेला फेकलेल्या व्हीव्हीपॅट स्लिप्स स्पष्ट दिसत आहेत. या स्लिप्स मतदानानंतर दोन दिवसांनी सापडल्या असून, या मतदारसंघात 6 नोव्हेंबर रोजी मतदान झाले होते.

हेही वाचा – Parliament Winter Session 2025 : संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची तारीख ठरली; केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी दिली महत्त्वाची अपडेट

घटनेची माहिती मिळताच जिल्हाधिकारी रोशन कुशवाह आणि पोलीस अधीक्षक घटनास्थळी पोहोचले. त्यांनी तत्काळ तपास सुरू करत सर्व स्लिप्स जप्त केल्या. तसेच उमेदवारांच्या उपस्थितीत पंचनामा करण्यात आला. मुख्य निवडणूक आयुक्तांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत समस्तीपूरच्या जिल्हा प्रशासनाला चौकशीचे आदेश दिले आहेत. प्राथमिक तपासात ही स्लिप्स मॉक पोलिंगदरम्यान वापरलेल्या असल्याचे स्पष्ट झाले आहे. तरीही निष्काळजीपणा झाल्याचे मान्य करून संबंधित एआरओ अधिकाऱ्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली असून, एफआयआर दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा – Ahmedabad Plane Crash : ‘वैमानिकांचा दोष नाही!’ सर्वोच्च न्यायालयाने कॅप्टन सुमीत सभरवाल यांच्या वडिलांचं भावनिक सांत्वन करत दिला धीर

जिल्हाधिकारी कुशवाह यांनी सांगितले, “सराईरंजन मतदारसंघातील डिस्पॅच सेंटरजवळ काही व्हीव्हीपॅट स्लिप्स सापडल्या. सर्व स्लिप्स जप्त करण्यात आल्या आहेत. या प्रकरणात दोन अधिकाऱ्यांविरुद्ध विभागीय चौकशी आणि निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.” या घटनेनंतर निवडणूक प्रक्रियेच्या पारदर्शकतेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून, विरोधकांनी आयोगाकडे कठोर कारवाईची मागणी केली आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number