Friday, March 21, 2025 10:26:36 AM

Pakistan Train Hijack : 'बलुचिस्तानच्या जन्माची वेळ आलीय..' पाकिस्तानी सैन्याचं मनोबल खचलंय - निवृत्त मेजर जनरल जी. डी. बक्षी

पाकिस्तानमधील बलुच लिबरेशन आर्मीने मंगळवारी जाफर एक्सप्रेस ट्रेनचं अपहरण केले. बीएलएने सुमारे 450 प्रवाशांना ट्रेनमध्ये ओलिस ठेवले. या घटनेवर निवृत्त मेजर जनरल जीडी बक्षी यांनी मोठं विधान केलं आहे.

pakistan train hijack  बलुचिस्तानच्या जन्माची वेळ आलीय पाकिस्तानी सैन्याचं मनोबल खचलंय - निवृत्त मेजर जनरल जी डी बक्षी

Pakistan Train Hijack : पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांतामध्ये बलोच लिबरेशन आर्मीने मंगळवारी क्वेट्टा येथून पेशावरला जाणाऱ्या जाफर एक्स्प्रेस या प्रवासी रेल्वेगाडीवर हल्ला चढवला आणि प्रवाशांना ओलीस ठेवले. त्यांनी 182 प्रवाशांना ओलीस ठेवल्याचा दावा केला होता. यानंतर पंजाब आणि सिंध प्रांतातून बलुचिस्तानला जाणाऱ्या सर्व रेल्वे सेवा पाकिस्तानने रद्द केल्या आहेत. पोलिसांनी यापैकी 155 ओलिसांची सुटका केली असून 27 दहशतवाद्यांचा खात्मा केला असल्याचे सांगितले आहे. तर, ट्रेनमधील प्रवाशांची सुटका करण्यासाठी पाकिस्तानी लष्कराने कारवाई सुरू केली असून लष्कर व फुटीरतावाद्यांमध्ये चकमकी चालू आहेत. या चकमकीत 30 जवान शहीद झाल्याचा दावा फुटीरतावाद्यांनी केला आहे. दुसऱ्या बाजूला, या घटनेबाबत पाकिस्तानी लष्कराने फारशी माहिती उघड केलेली नाही.

बलुचिस्तान लिबरेशन आर्मीने (बीएलए) जाफर एक्सप्रेसमधील सुरक्षा दलांसह 214 हून अधिक प्रवाशांना ओलीस ठेवल्याचा दावा केला आहे. पाकिस्तानी लष्कर फुटीरतावाद्यांविरोधात काय कारवाई करणार? ओलिसांची सुटका कशी करणार? याकडे जगाचं लक्ष लागलं आहे. ट्रेनचं अपहरण केल्यानंतर त्यांनी 182 प्रवाशांना ओलीस ठेवल्याचा दावा करण्यात आला होता. मात्र, पोलिसांनी हा दावा खोडून काढला. तसंच जवळपास 350 प्रवासी सुखरुप असल्याचीही माहिती पोलिसांनी दिली. या हल्ल्याची जबाबदारी घेतलेल्या बलुचिस्तान लिबरेशन आर्मी या संघटनेवर पाकिस्तान, ब्रिटन आणि अमेरिकेने याआधीच बंदी घातली  आहे.

हेही वाचा - पाकिस्तानात अख्खी ट्रेनच झाली हायजॅक..! बलुचिस्तानच्या स्वातंत्र्याची मागणी करणाऱ्या प्रमुख गटाने स्वीकारली जबाबदारी

पाकिस्तानमधील सतत धुमसणाऱ्या बलुचिस्तान प्रांतात फुटीरतावाद्यांनी 11 मार्चला संपूर्ण ट्रेनचं अपहरण केलं. सुमारे 450 प्रवाशांना घेऊन पेशावरला जाणाऱ्या जाफर एक्स्प्रेसवर फुटीरतावाद्यांनी हल्ला केला आणि त्यांनी या ट्रेनचं अपहरण केलं होतं. तथापि, महिला, मुले आणि बलुच नागरिकांना नंतर सोडण्यात आले. 182 ओलिस अद्याप त्यांच्या ताब्यात आहेत, असा दावा बीएलएने केला होता. यामध्ये पाकिस्तानी सैन्य, पोलीस, आयएसआय आणि एटीएफ कर्मचारी यांचा समावेश आहे. या सर्वांमध्ये मेजर जनरल जीडी बक्षी (सेवानिवृत्त) यांनी मोठा दावा केला आहे. ते म्हणाले की, 'बलुचिस्तान पाकिस्तानच्या नियंत्रणाबाहेर गेला आहे.' स्वतंत्र बलुस्तानची मागणी करणाऱ्यांनी प्रवाशांनी भरलेल्या अख्ख्या ट्रेनचं अपहरण करणं ही फार मोठी गोष्ट आहे, असे संरक्षण तज्ज्ञ सांगत आहेत. भारतातील सेवानिवृत्त मेजर जनरल जीडी बक्षी म्हणाले, 'पाकिस्तानी सैन्याचं मनोबल खचले आहे. बलुचिस्तान पाकिस्तानच्या नियंत्रणाबाहेर गेला आहे. मला वाटते, बलुचिस्तानच्या जन्माची वेळ आली आहे.'

सैनिक आणि नागरिकांच्या जीवितहानीशिवाय पाकिस्तानी लष्कर कारवाई करू शकणार नाही
मेजर जनरल जीडी बक्षी (सेवानिवृत्त) यांनी बलुचिस्तानमध्ये जाफर एक्सप्रेस ट्रेनच्या हल्ल्याबद्दल सांगितले की पाकिस्तानी सैन्यात मनोबल पडले आहे. बलुचिस्तानमध्ये ट्रेनचे अपहरण होणे ही घटना खूप मोठी आणि  महत्त्वाची आहे. ट्रेनमध्ये 450-500 लोकंना त्यांनी ओलीस ठेवले आहे. ओलिसांची सोडवणूक करणे हे एक अतिशय गंभीर ऑपरेशन आहे. अशा कुठल्याही घटनेत ओलिसांची सुटका करण्यासाठी जी कारवाई केली जाते ती अतिशय नाजूक असते. या कारवाईदरम्यान झालेल्या एक चुकीची संपूर्ण देशाला शिक्षा भोगावी लागू शकते. मला असे वाटत नाही की, पाकिस्तानी सैन्य कोणत्याही नुकसानाशिवाय म्हणजेच जीवितहानीशिवाय असे काम करू शकते. अशी ऑपरेशन्स खूप नाजूक आणि अचूकपणे करावी लागतात. जे भारतीय एनएसजी खूप चांगल्या प्रकारे करू शकतात. परंतु, पाकिस्तानी सैन्य काहीतरी चांगले करण्याऐवजी दिखाऊपणा करण्यात गुंतलेले असते. मोठ-मोठ्या बंदुका, तोफा घेऊन काही मोठी कारवाई करत असल्याचे दाखवण्याची पद्धत अजब आणि स्वतःचेच नुकसान करणारी आहे.

हेही वाचा - पाकिस्तान बनला 'आतंकिस्तान'.. जागतिक दहशतवाद निर्देशांकात दुसऱ्या स्थानावर पोहोचण्याचा 'विश्वविक्रम'

निवृत्त मेजर जनरल बक्षी म्हणाले, “ओलिसांची सुटका करताना लष्कर किंवा कमांडो ज्या प्रकारच्या मोहिमा हाती घेतात त्यामध्ये एनएसजी ही सर्वोत्तम आहे. एनएसजीने अशा कारवाया अचूक पार पाडल्या आहेत. परंतु, पाकिस्तानी लष्कर बऱ्याचदा केवळ दिखाऊपणा करण्यात दंग असतं. अशा वेळी ते समोर उभ्या शत्रूला घाबरवू या हेतूने ते मोठी शस्त्रास्रे, तोफखाना घेऊन बाहेर पडतात. आत्ता पाकिस्तानी लष्कर ज्या प्रकारची कारवाई करू पाहतंय त्यावरून असं वाटतंय की यामध्ये मोठी जीवितहानी होऊ शकते. 

बलुचिस्तानच्या जन्माची वेळ आली आहे- जीडी बक्षी
ते म्हणाले, मला वाटते की, पाकिस्तानी सैन्य अशा काही प्रकारचे आततायीपणाने ऑपरेशन करेल की, ज्यात बर्‍याच नागरिकांच्या जिवाला धोका पोहोचू शकतो. मला वाटते, बलुचिस्तानच्या जन्माची वेळ आली आहे. भारताला या सर्व घटनांकडे काळजीपूर्वक दृष्टिकोनातून पाहावे लागेल आणि सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. कारण, पाकिस्तानी सैन्य लक्ष विचलित करण्यासाठी आणि स्वतःचे अपयश लपवण्यासाठी काहीही करू शकते. आपण आपल्या सर्व सीमांवर सावधगिरी बाळगली पाहिजे आणि देशाच्या सीमा सुरक्षित ठेवल्या पाहिजेत.

हेही वाचा - 'आर्टिकल 370 हटवलं, निवडणुका झाल्या; आता पाकव्याप्त काश्मीर परत मिळायचाय..,' लंडनमध्ये जयशंकर यांचं मोठं विधान, जगाच्या भुवया उंचावल्या

कशी हायजॅक केली ट्रेन?
जाफर एक्सप्रेस पाकिस्तानच्या नैऋत्य बलुचिस्तान प्रांतातील क्वेट्टा येथून खैबर पख्तूनख्वामधील पेशावरला जात होती. त्यात सुमारे 450 प्रवासी होते. बालोन पास बोगद्याजवळ हत्यारबंद बलुचींनी ट्रेन थांबविली. प्रथम येथील रेल्वे रूळ उखडण्यात आले. यानंतर, जेव्हा ट्रेन थांबली, तेव्हा बलुचींनी गोळीबार केला. या काळात 20 पाकिस्तान सुरक्षा कर्मचार्‍यांनाही ठार मारण्यात आले, असा बीएलएचा दावा आहे. यानंतर, ट्रेनला ताब्यात घेण्यात आले आणि प्रवाशांना ओलीस ठेवण्यात आले.

दरम्यान, भारत या घटनेवर लक्ष ठेवून आहे. या स्थितीत भारताचं पाकिस्ताबरोबरच्या सीमा अधिक सुरक्षित करण्याकडे लक्ष आहे. भारताने या घटनेवर अद्याप कोणतंही अधिकृत भाष्य केलं नसलं तरी भारतीय लष्करातून निवृत्त झालेले मेजर जनरल जी. डी. बक्षी यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, “बलुचिस्तान आता पूर्णपणे पाकिस्तानच्या नियंत्रणाबाहेर गेलं आहे. तिथली सध्याची स्थिती व जनतेचा उद्रेक पाहता स्वतंत्र बलुचिस्तानच्या जन्माची वेळ आली आहे असं म्हणावं लागेल.” या घटनेवर आपण (भारताने) काळजीपूर्वक लक्ष ठेवलं पाहिजे आणि सतर्क राहिलं पाहिजे. कारण पाकिस्तानी लष्कर लक्ष विचलित करण्यासाठी काहीही करू शकतं. आपल्याला आपल्या सीमा सुरक्षित ठेवाव्या लागतील. यासाठी सावध राहावं लागेल.

हेही वाचा - Video Viral: पाकिस्तानी पंतप्रधानांची अजब देहबोली! मूठ आपटून म्हणाले, 'भारताला हरवलं नाही तर माझं नाव शाहबाज शरीफ नाही!'


सम्बन्धित सामग्री