गर्लफ्रेंडला भेटायला गुपचूप गेला, पण छोले भटुरेनेच फोडलं बिंग, भरबाजारात पत्नीने पकडलं अन् पुढे..

UP Crime News : उत्तर प्रदेशातून एक अनोखी घटना समोर आली आहे. गर्लफ्रेंडच्या आवडीचा पदार्थ आणण्यासाठी गेलेल्या एका व्यक्तीसोबत घडलेल्या प्रकाराची सध्या चर्चा सुरू आहे. पत्नीला याची कुणकुण लागल्यानंतर प्रकरणाला अनपेक्षित वळण मिळालं. नेमकं काय घडलं? जाणून घ्या सविस्तर.

गर्लफ्रेंडला भेटायला गुपचूप गेला, पण छोले भटुरेनेच फोडलं बिंग, भरबाजारात पत्नीने पकडलं अन् पुढे..
Crime News

लग्नानंतर बऱ्याचदा पती-पत्नीच्या नात्यात दुरावा निर्माण होतो. अशा परिस्थितीत काहीजण विवाहबाद्य संबंधांमध्ये गुंतून जातात. आपल्या प्रेयसीला खुश करण्यासाठी तिच्या आवडीच्या वस्तू आणण्यापासून ते अनेक गोष्टी या केल्या जातात. उत्तर प्रदेशात असाच एक अनोखा प्रकार समोर आलेला आहे. कामावर जात असल्याचं सांगत एक व्यक्ती आपल्या प्रेयसीला भेटायला गेला. मात्र, छोले भटुरेमुळे त्याचं गुपित उघड झालं. नेमकं काय घडलं?, जाणून घ्या सविस्तर.

कामावर जाण्याचा बहाणा
मिळालेल्या माहितीनुसार, ही संपूर्ण घटना उत्तर प्रदेशातील हापूर येथील ब्रिजघाट परिसरात घडली आहे. या ठिकाणी अजय नावाचा व्यक्ती त्या दिवशी आपल्या प्रेयसीसोबत एका गेस्ट हाऊसमध्ये थांबलेला होता. याच दरम्यान तो बाहेर खाण्यासाठी चोले भटुरे आणण्यासाठी गेला. नेमक्या त्याच वेळी त्याची पत्नी कविता ही तिच्या घरच्यांसह तिथे पोहोचली. खरं तर अजय दुसऱ्या महिलेसोबत असल्याची माहिती तिला कळताच कविता घरच्यांसह ब्रिजघाट या परिसरात आली होती. अजय याला शोधत असताना तो तिला गेस्ट हाऊसजवळ दिला आणि तिने त्याला गाठले. त्यानंतर या संपूर्ण प्रकरणाला एक वेगळंच वळण मिळालं.

हेही वाचा – अनर्थ टळला! होमगार्ड्सची सतर्कता; रेल्वे रुळावरून वेळीच महिलेला चिमुकल्यासह केलं बाजूला

नवऱ्याचं डबल गेम ओपन
सर्व प्रकार घरच्यांच्या समोर येताच कविताने अजयसंबंधित अनेक धक्कादायक गोष्टी समोर आणल्या. ज्यात अजय हा दररोज कामावर जातो असल्याचे सांगत घरातून बाहेर जात होता. मात्र, प्रत्यक्षात तो कामावर न जाता त्याच्या प्रेयसीला भेटत होता, असा दावा कविताने केलाय. अजयला संबंधित ठिकाणी पाहताच त्याला जाब विचारला आणि भर बाजारात कवितासह तिच्या कुटुंबीयांनी अजयला मारहाण केली. अचानक घडलेल्या या घटनेमुळे बाजारात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते

पती म्हणाला काहीतरी वेगळंच
या दरम्यान, कविताने केलेले सर्व आरोप अजयने फेटाळले आहे. तो म्हणाला,’मी कोणत्याही महिलेसोबत नव्हतो, घरातून मिळत असलेल्या मानसिक तणावामुळे मी ब्रिजघाटला आलो होतो’. तर त्यानंतर कवितानेही, दोन प्लेट छोले भटुरे कोणासाठी आणत होता, असा प्रश्न त्याला विचारत सर्व आरोप त्याचे फेटाळले आहेत. सध्या हे प्रकरण पोलीस ठाण्यात पोहोचलं असून हे प्रकरण मिटवण्यासाठी दोघांनीही सहमती दिली आहे.

महाराष्ट्राच्या सर्व बातम्या एका क्लिकवर

महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी | Maharashtra News Live Update

Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number