लंच ब्रेक म्हटलं की काही मिनिटांत जेवण उरकणं, थोडा आराम करणं किंवा कामाच्या गडबडीतून स्वत:साठी वेळ काढणं, एवढंच साधारण घडतं. मात्र, एका महिलेचा लंच ब्रेक हा तिच्या संपूर्ण आयुष्यातील सर्वात मोठा आर्थिक टर्निंग पॉइंट ठरला. अवघ्या 20 डॉलरमध्ये खरेदी केलेल्या स्क्रॅच-ऑफ लॉटरी तिकीटामुळे ती तब्बल 2 मिलियन डॉलरची विजेती ठरलेली आहे.
लंच ब्रेकमध्ये नशीब चमकलं
व्हर्जिनिया या राज्यातील पोर्ट्समाउथ येथील ही महिला लंच ब्रेमदरम्यान एका दुकानात गेली होती. त्याच दिवशी तिला कामाचा ताण जास्त असल्याने तिने नशीब आजमावण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर तिने 20 डॉलक किमतींच प्लॅटिनम 7s स्क्रॅच-ऑफ तिकीट विकत घेतलं आणि त्याच दुकाना ते तिकीट स्क्रॅच देखील केलं. पुढच्या क्षणी तिला मोठं बक्षीस मिळाल्याचं समजून आलं.
हेही वाचा-Bank : ATM व्यवहार फ्री! बँकांचा संप सुरू होण्याआधी मोठा निर्णय; पण फायदा कोणाला?
स्वत:च तिकीट तपासल्यानंतर तिला आपण या लॉटरीतील सर्वात मोठं म्हणजेच तब्बल 2 मिलियन डॉलरचं बक्षीस जिंकल्याचं समजलं. खरं तर भारतीय चलनात ही रक्कम साधारण 19 कोटी रुपयांपेक्षा अधिक आहे. विशेष म्हणजे एवढी मोठी रक्कम जिंकल्यांच समजल्यानंतर तिला सेलिब्रेशन करण्यासाठी ही वेळ मिळाला नाही. कारण महिलेच्या लंच ब्रेकचा वेळ संपत आलेला होता. त्यानंतर महिलेने जिंकलेलं तिकीट सुरक्षित ठेवलं आणि कोणालाही काही न सांगता थेट कामावर पुन्हा परतली. महिलेने नेहमीप्रमाणे आपली शिफ्ट पूर्ण केली.
संबंधित लॉटरीच्या अधिकाऱ्यांनी काय सांगितले.
महिलेला बक्षिसाची रक्कम स्वीकारताना तिच्यासमोर दोन पर्याय होते. पहिला तर 2 मिलियन डॉलरची रक्कम 30 वर्षांत हप्त्यांमध्ये घेणं किंवा एकरकमी रक्कम स्वीकारणं. तर महिलेने सर्व रक्कम एकत्रच घेण्याचा निर्णय घेतला. कर कपातीपूर्वी तिला साधारण 9 कोटी रुपयांपेक्षा अधिक रक्कम मिळणार आहे. तसंच तिने आपली ओळखही गुप्त ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.