Bank : ATM व्यवहार फ्री! बँकांचा संप सुरू होण्याआधी मोठा निर्णय; पण फायदा कोणाला?

Bank : वापरणाऱ्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. बँकांचा संप सुरू होण्यापूर्वी तीन दिवस ATM व्यवहारांवर शुल्क आकारले जाणार नाही.

Bank :  ATM व्यवहार फ्री! बँकांचा संप सुरू होण्याआधी मोठा निर्णय; पण फायदा कोणाला?
ATM व्यवहार 3 दिवस फ्री

बँका बंद राहिल्या तरी आता पैशांची चिंता नको, कारण देशातील सर्वांत मोठी बँक SBI ही तुमच्या मदतीला आता धावून आलेली आहे. बँक कर्मचारी संघटनांनी केल्या जाणाऱ्या 28, 29,30 सप्टेंबर आणि 1 ऑक्टोबरला देशव्यापी तब्बल 3 दिवसांचा संप पुकारला आहे. याच संपामुळे असंख्य ग्राहकांचे हाल होऊ नये म्हणून आता SBI ने एक भन्नाट निर्णय घेतलेला आहे. नेमका काय आहे एसबीआयची ऑफर जाणून घ्या.

संपाआधीच ग्राहकांना दिलासा
मिळालेल्या माहितीनुसार, 28, 29,30 सप्टेंबर या तीन दिवसात SBI च्या एटीएममधून पैसे काढत असताना एकही रुपयाचा शुल्क लागणार नाही. ग्राहकांच्या मोफत व्यवहारांची मर्यादा संपली असेली तरी हे 3 दिवस कोणताही चार्जेस लागणार नाहीत. विशेष म्हणजे, ही सुविधा फक्त SBI च्या एटीएम पुरती मर्यादित नाही. SBI ने स्पष्ट केलेले आहे की, या दिवसात जर ग्राहक देशातील कोणत्याही बँकेच्या एटीएममधऊन पैसे काढले तरी SBI तुमच्याकडून कोणत्याही प्रकारचे शुल्क वसूल करणार नाही. ग्राहक पाहिजे तेवढे पैसे कधीही आणि कुठेही काढू शकता. SBI ने एक्स या सोशल मीडियावर पोस्ट करत याची अधिकृत माहितीही दिलेली आहे. डिजिटल सेवा सुरु राहणार

डिजिटल सेवा सुरूच राहणार
संपाच्या दिवसात बँकेच्या शाखा जरी बंद राहिल्या तरी YONO, इंटरनेट बँकिग, मोबाईल बँकिंग तसेच UPI या सारख्या सर्व डिजिटल सेवा या नेहमीप्रमाणे सुरु राहतील.त्यामुळेच ऑनलाइन व्यवहारांना कोणत्याही प्रकाराचा परिणाम होणार नाही.

 हेही वाचा-ST Bus Ticket Booking : ST बसचं तिकीट काढणं झालं झटपट; ‘हा’ नंबर आजच मोबाईलमध्ये सेव्ह करा

रविवारीही बँका सुरू
ग्राहकांची गैरसोय टाळण्यासाठी अजून एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे, त्यानुसार SIB ने येत्या रविवारी म्हणजे 28 सप्टेंबर रोजी देखील आपल्या शाखा सुरु ठेवण्याचा निर्णय घेतलेला आहे. या निर्णयामुळे लोकांना संपाआधीच आपली महत्त्वाची कामे पूर्ण करता येतील. मात्र, या निर्णयाला कर्मचारी संघटनांनी विरोध दर्शवला आहे.

Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number