30 सप्टेंबर रोजी सहामाही आर्थिक लेखाजोख्याची प्रक्रिया असल्याने, या संपामुळे सरकारी बँका आणि प्रादेशिक ग्रामीण बँकांच्या कामकाजावर अधिक विपरित परिणाम होऊ शकतो.
पाच दिवसांचा वर्किंग आठवडा, 5 मार्च 2024 चा द्विपक्षीय वेतन करार आणि इतर मागण्यांसाठी युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्सच्या नेतृत्वाखाली बँक कर्मचाऱ्यांनी देशव्यापी संप पुकारला…
Bank : वापरणाऱ्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. बँकांचा संप सुरू होण्यापूर्वी तीन दिवस ATM व्यवहारांवर शुल्क आकारले जाणार नाही.
बँकांचा संप सुरू होण्यापूर्वी सर्वसामान्य ग्राहकांना आपले आर्थिक व्यवहार पूर्ण करता यावेत, यासाठी रविवारी 27 सप्टेंबर रोजी बँका उघड्या ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
बँकिंग क्षेत्रातील 90 टक्क्यांहून अधिक कर्मचाऱ्यांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या 'युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्स' (UFBU) या संघटनेने या संपाची हाक दिली आहे.