Bank Strike Update: उद्यापासून बँकांचा 3 दिवसांचा देशव्यापी संप; जाणून घ्या कोणत्या सेवांवर होणार परिणाम?

30 सप्टेंबर रोजी सहामाही आर्थिक लेखाजोख्याची प्रक्रिया असल्याने, या संपामुळे सरकारी बँका आणि प्रादेशिक ग्रामीण बँकांच्या कामकाजावर अधिक विपरित परिणाम होऊ शकतो.

Bank Strike Update: उद्यापासून बँकांचा 3 दिवसांचा देशव्यापी संप; जाणून घ्या कोणत्या सेवांवर होणार परिणाम?
बँकांच्या 3 दिवसांच्या देशव्यापी संपादरम्यान ‘या’ सेवा राहणार बंद

Bank Strike Update: देशभरातील बँकांच्या शाखांमध्ये 28 ते 30 सप्टेंबर (सोमवार, मंगळवार आणि बुधवार) या कालावधीत सलग तीन दिवस संप पाळला जाणार आहे. या संपामुळे बँक कर्मचाऱ्यांच्या थेट सहभागाची गरज असणाऱ्या कामकाजावर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. 30 सप्टेंबर रोजी सहामाही आर्थिक लेखाजोख्याची प्रक्रिया असल्याने, या संपामुळे सरकारी बँका आणि प्रादेशिक ग्रामीण बँकांच्या कामकाजावर अधिक विपरित परिणाम होऊ शकतो. मात्र खाजगी बँकांच्या दैनंदिन कामकाजावर याचा फारसा परिणाम होणार नाही.

कोणत्या सेवांवर होणार परिणाम?

बँक शाखांमधील रोख व्यवहार
बँकेच्या काउंटरवर प्रत्यक्ष जाऊन रोख रक्कम जमा करणे किंवा काढणे कठीण होऊ शकते. तसेच पासबुक अद्ययावत करण्याचे कामही या काळात थांबवले जाऊ शकते.

चेक आणि डिमांड ड्राफ्ट (DD)
चेक क्लिरिंगशी संबंधित व्यवहारांना विलंब होऊ शकतो आणि बँकेच्या शाखेतून नवीन डिमांड ड्राफ्ट मिळवण्यामध्ये अडचणी येऊ शकतात.

केवायसी आणि कर्ज प्रक्रिया
केवायसी (KYC) पूर्तता, कागदपत्रांची पडताळणी तसेच कर्जाशी संबंधित कागदपत्रे जमा करण्याच्या प्रक्रियेला उशीर होऊ शकतो.

बँक लॉकर्सची सुविधा
बँकांच्या शाखा बंद राहणार असल्यामुळे ग्राहकांना प्रत्यक्ष बँक लॉकर्सची सुविधा उपलब्ध होणार नाही. जर लॉकर्समधील काही महत्त्वाच्या वस्तू काढायच्या असतील, तर संप सुरू होण्यापूर्वीच बँकेशी संपर्क साधणे आवश्यक आहे.

कोणत्या डिजिटल आणि इतर सेवा सुरू राहणार?

हा संप प्रामुख्याने बँकांच्या भौतिक शाखांमधील कामकाजाशी निगडित आहे. त्यामुळे डिजिटल सेवांवर याचा परिणाम होण्याची शक्यता नाही:

युपीआय (UPI) आणि मोबाईल बँकिंग
युपीआय (UPI), मोबाईल बँकिंग आणि इंटरनेट बँकिंग यांसारख्या सर्व डिजिटल सेवा सुरळीत सुरू राहतील. याद्वारे तुम्ही घरबसल्या पैसे पाठवणे, बिले भरणे आणि इतर ऑनलाइन व्यवहार करू शकता.

एटीएम सेवा
देशभरातील एटीएम (ATM) सेवा सुरू राहण्याची अपेक्षा आहे. तथापि, एटीएममधील रोख रकमेची उपलब्धता स्थानिक पातळीवर रोख भरण्याच्या व्यवस्थेवर अवलंबून असेल. ज्या ठिकाणी ‘कॅश डिपॉझिट मशीन्स’ उपलब्ध आहेत, तिथे रोख रक्कम जमा करणे शक्य होईल.

हेही वाचा – Mobile Recharge: मोबाइल वापरकर्त्यांना मोठा दिलासा; आता वर्षाला 13 ऐवजी करावे लागणार फक्त ‘इतके’ रिचार्ज

बँक संपामुळे होणारा त्रास टाळण्यासाठी काय करावे?

हा संप सुरू होण्यापूर्वी, म्हणजेच २७ सप्टेंबर रोजी रविवार असूनही सार्वजनिक क्षेत्रातील बँका आणि प्रादेशिक ग्रामीण बँका सुरू ठेवण्यात आल्या होत्या, जेणेकरून ग्राहकांची महत्त्वाची कामे पूर्ण होऊ शकतील. आता संप सुरू झाल्यामुळे, रोख रक्कम किंवा अन्य महत्त्वाच्या कामकाजासाठी बँक शाखेत जाण्याऐवजी डिजिटल माध्यमांचा वापर करणे सोयीचे ठरेल.

Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number