Vice President Jagdeep Dhankhar
Edited Image
Vice President Jagdeep Dhankhar Discharged: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या प्रकृतीशी संबंधित महत्त्वाची माहिती समोर आली आहे. दिल्ली एम्सने त्यांच्या प्रकृतीबद्दल अपडेट दिले आहे. दिल्ली एम्सने म्हटले आहे की, 'उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांना एम्स दिल्लीमधून डिस्चार्ज देण्यात आला आहे. हृदयरोगामुळे त्यांना 9 मार्च रोजी एम्समध्ये दाखल करण्यात आले होते. त्याच्या प्रकृतीत समाधानकारक सुधारणा झाली आहे. पुढील काही दिवस त्यांना पुरेशी विश्रांती घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे.'
छातीत त्रास; उपराष्ट्रपती एम्समध्ये दाखल -
दरम्यान, उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांना रविवारी पहाटे दिल्लीतील अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था (एम्स) च्या हृदयविकार विभागात दाखल करण्यात आले होते. रुग्णालयातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांची प्रकृती स्थिर असून त्यांना निरीक्षणाखाली ठेवण्यात आले आहे. छातीत दुखत असल्याच्या तक्रारीनंतर उपराष्ट्रपतींना एम्समध्ये दाखल करण्यात आले. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांना रविवारी पहाटे 2 वाजताच्या सुमारास अस्वस्थता आणि छातीत दुखण्याची तक्रार आल्यानंतर एम्समध्ये आणण्यात आले होते.
हेही वाचा - उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांची प्रकृती बिघडली, एम्स रुग्णालयात दाखल
पंतप्रधान मोदींनी केली उपराष्ट्रपतींच्या प्रकृतीची विचारपूस -
तथापि, उपराष्ट्रपतींवर एम्सचे कार्डिओलॉजी विभाग प्रमुख डॉ. राजीव नारंग यांच्या देखरेखीखाली उपचार सुरू होते. त्यांना एम्सच्या क्रिटिकल केअर युनिटमध्ये ठेवण्यात आले होते. त्यांच्या प्रकृतीची काळजी घेत, त्यांच्या तपासण्या आणि चाचण्या केल्या जात होत्या. पंतप्रधान मोदींनी उपराष्ट्रपतींच्या प्रकृतीची विचारपूस केली होती.
हेही वाचा - ''सदनातला गदारोळ ही अत्यंत चिंतेची बाब आहे''
जगदीप धनखड यांनी 11 ऑगस्ट 2022 रोजी भारताचे 14 वे उपराष्ट्रपती म्हणून शपथ घेतली. धनखड यापूर्वी पश्चिम बंगालचे राज्यपालही राहिले आहेत. उपराष्ट्रपती धनखड यांनी पंजाब विद्यापीठातून शिक्षण घेतले आणि नंतर कायद्याची पदवी मिळवली. जगदीप धनखड हे उत्तम सामाजिक कार्यकर्ते देखील आहेत.