Wednesday, July 09, 2025 08:49:30 PM

Video Before Crash: टेक ऑफपूर्वीचे आनंदाचे क्षण अन् क्षणार्धात होत्याचं नव्हतं

आता विमान टेक ऑफपूर्वीचा व्हिडीओ जय महाराष्ट्रच्या हाती लागला आहे. हा व्हिडिओ विमानाच्या आतमधील आहे.

video before crash टेक ऑफपूर्वीचे आनंदाचे क्षण अन् क्षणार्धात होत्याचं नव्हतं

अहमदाबाद: एअर इंडियाच्या विमानाचा अहमदाबादमध्ये अपघात झाला. या अपघातात एकूण 265 जणांचा मृत्यू झाला. त्यात 241 विमानातले तर 24 जण रुग्णालय वसाहतीतले होते. या विमान अपघातानंतर वेगवेगळी माहिती समोर येत आहे. आता विमान टेक ऑफपूर्वीचा व्हिडीओ जय महाराष्ट्रच्या हाती लागला आहे. हा व्हिडिओ विमानाच्या आतमधील आहे. मुलीच्या पदवी सोहळ्यासाठी आई-बाबा निघाले होते. मुलीली सरप्राईज देण्यासाठी हे दाम्पत्य निघालं होतं. टेक ऑफपूर्वीचे आनंदाचे क्षण अन् क्षणार्धात होत्याचं नव्हतं.

12 जून रोजी एअर इंडियाच्या विमानाने उड्डाण घेतलं. मात्र,  241 जणांसाठी हे उड्डाण अखेरचं ठरलं. विमानाच्या टेक ऑफपूर्वीचे काही व्हिडीओ 'जय महाराष्ट्र'च्या हाती आले आहेत. टेक ऑफपूर्वी प्रवाशांचे आनंदाचे क्षण कॅमेऱ्यात कैद केले. पण, हे क्षण त्यांच्यासाठी अखेरचे ठरले. एक दाम्पत्य मुलीला सरप्राईज देण्यासाठी लंडनला निघालं होतं. मुलीच्या पदवी सोहळ्यासाठी आई-बाबा तिला सरप्राईज देण्यासाठी निघाले होते. टेक ऑफपूर्वीचे आनंदाचे अनेक प्रवाशांनी कॅमेऱ्यात कैद केले. मात्र, क्षणार्धात होत्याचं नव्हतं झालं.

हेही वाचा : एअर इंडिया करणार 120 मिलियन डॉलर्सचा क्लेम

अहमदाबाद विमान अपघातामुळे संपूर्ण जगालाच धक्का बसला आहे. या विमानात एकूण 242 लोक प्रवास करत होते. यातील फक्त एक प्रवासी बचावलाय. दरम्यान, टेक ऑफ केल्यानंतर पुढच्याच काही मिनिटांत हे विमान एका इमारतीवर आदळलं. त्यानंतर या विमानाचा स्फोट झाला. 


सम्बन्धित सामग्री