Tuesday, June 09, 2026 02:08:59 PM

West Bengal Election Result 2026: अमित शाहांनी म्हटलं आणि करून दाखवलं! बंगालमध्ये ममता बॅनर्जींच्या साम्राज्याला धक्का

भाजपचे चाणक्य मानले जाणारे अमित शाह यांनी निवडणुकीच्या सुरुवातीलाच वर्तवलेले भाकीत आता पूर्णपणे खरे ठरले आहे. त्यांच्या रणनीतीमुळेच भाजप बंगालमध्ये मोठ्या विजयाच्या जवळ पोहोचला आहे.

west bengal election result 2026 अमित शाहांनी म्हटलं आणि करून दाखवलं बंगालमध्ये ममता बॅनर्जींच्या साम्राज्याला धक्का

West Bengal Election Result 2026 Amit Shah : गेल्या 15 वर्षांपासून पश्चिम बंगालमध्ये एकहाती सत्ता गाजवणाऱ्या ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसला यंदा पराभवाचा मोठा धक्का बसला आहे. देशातील इतर राज्यांमध्ये भाजपची लाट असतानाही बंगालचा गड लढवणाऱ्या ममता बॅनर्जींना अखेर या निवडणुकीत नमावे लागले. सोमवारी समोर आलेल्या निकालांच्या कलानुसार, पश्चिम बंगालमध्ये सत्तांतराचे स्पष्ट संकेत मिळाले असून ममतांचे साम्राज्य उद्ध्वस्त झाले आहे. विरोधातील कणखर नेत्या म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ममता बॅनर्जी यांच्या हातातून आता बंगालची सत्ता निसटली आहे.

अमित शाहांचे भाकीत ठरले खरे
भाजपचे चाणक्य मानले जाणारे अमित शाह यांनी निवडणुकीच्या सुरुवातीलाच वर्तवलेले भाकीत आता पूर्णपणे खरे ठरले आहे. शाह यांनी पहिल्या टप्प्यातील मतदानानंतर भाजपला मोठ्या विजयाची खात्री दिली होती. तेव्हा त्यांनी 170 जागा जिंकण्याचा दावा केला होता, जो आता वास्तवात उतरताना दिसत आहे. संपूर्ण निवडणूक काळात अमित शाह यांनी बंगालमध्ये तळ ठोकून स्वतः सर्व सूत्रे हलवली होती. त्यांच्या रणनीतीमुळेच भाजपला या निवडणुकीत ऐतिहासिक यश संपादन करता आले आहे.

हेही वाचा - West Bengal Election 2026: बंगालमध्ये 'कमळ' फुलणार? सुरुवातीच्या कलानं वाढवलं ममतादीदींचं टेंशन, भाजपची बहुमताकडे वेगाने घोडदौड

जागांचे समीकरण आणि निर्णायक कल
पश्चिम बंगालमध्ये सत्ता स्थापनेसाठी 148 जागांच्या बहुमताची गरज असताना भाजपने 157 जागांवर आघाडी घेऊन स्पष्ट वर्चस्व निर्माण केले आहे. याउलट सत्ताधारी तृणमूल काँग्रेस अवघ्या 115 जागांवर मर्यादित राहिली आहे. भाजपच्या या हिंदुत्वाच्या राजकारणाला बंगालमध्ये मोठे यश मिळाले असून पहिल्यांदाच राज्यात भाजपचे सरकार येणार आहे. यापूर्वी 2016 आणि 2021 मध्ये भाजपने प्रयत्न केले होते, मात्र यंदा सर्व ताकद पणाला लावून त्यांनी हा विजय खेचून आणला आहे.

निवडणुकीतील महत्त्वाचे घटक
या विजयामागे कडक सुरक्षा व्यवस्था आणि निवडणूक आयोगाची काही पावले निर्णायक ठरली. निवडणुकीदरम्यान सुमारे 2,00,000 CRPF जवान तैनात करण्यात आले होते. विशेष म्हणजे, केंद्रीय निवडणूक आयोगाने SIR मोहिमेअंतर्गत मतदार यादीतून तब्बल 90,00,000 संशयास्पद मतदारांची नावे वगळली होती, ज्याचा परिणाम निकालावर झाल्याचे बोलले जात आहे. 24 एप्रिल रोजी झालेल्या पहिल्या टप्प्यापासूनच भाजपने आपली पकड मजबूत करण्यास सुरुवात केली होती, जी अखेर विजयात परावर्तित झाली.

हेही वाचा - Tamilnadu Election Result 2026: सिनेस्टारच्या हाती जाणार राज्याची सूत्र? तमिळनाडूत 'विजयी' घोडदौड, 'TVK' 74 जागांवर आघाडीवर


सम्बन्धित सामग्री





ताज्या बातम्या




ताज्या बातम्या