‘ज्ञानेश कुमार यांच्याकडे कोणती गुप्त माहितीये ज्यामुळे भाजप त्यांना वाचवतयं?’; सौरव दास यांचा सवाल

पत्रकार परिषदेत बोलताना सौरव दास यांनी दिल्ली पोलीस आणि केंद्र सरकारच्या कारभारावर गंभीर प्रश्न उपस्थित केले. "आमच्या विरोधात दिल्ली पोलिसांकडून अनेक नोटिसा पाठवण्यात आल्या असून आंदोलकांवर कोठडीत हिंसाचार केला जात आहे. अशा वेळी राष्ट्रीय मानवाधिकार आयोग (NHRC) आणि सर्वोच्च न्यायालय गप्प का आहेत?" असा सवाल त्यांनी केला.

‘ज्ञानेश कुमार यांच्याकडे कोणती गुप्त माहितीये ज्यामुळे भाजप त्यांना वाचवतयं?’; सौरव दास यांचा सवाल

दिल्लीत मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी आयोजित आंदोलनादरम्यान ताब्यात घेण्यात आलेल्या ‘कॉकरोच जनता पार्टी’च्या (CJP) प्रमुख नेत्यांची अखेर कार्यकारी सुटका झाली आहे. सुटका झाल्यानंतर पक्षाचे प्रमुख अभिजीत दीपके हे आजीच्या अकस्मात निधनामुळे तात्काळ आपल्या कुटुंबाच्या भेटीसाठी महाराष्ट्रातील हिंगोलीकडे रवाना झाले. दुसरीकडे, सुटका झालेले पक्षाचे इतर प्रमुख नेते सौरव दास आणि आशुतोष रांका यांनी तात्काळ संयुक्त पत्रकार परिषद घेत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांच्यावर तीव्र शब्दांत हल्लाबोल केला. मागील 72 तासांत हजारो कार्यकर्त्यांना बेकायदेशीररीत्या ताब्यात घेऊन मारहाण केल्याचा आरोप त्यांनी पत्रकार परिषदेत केला.

स्वतंत्र पत्रकारांवर कारवाई अन् गुरुद्वारा बांगला साहिबचा अवमान केल्याचा आरोप

पत्रकार परिषदेत बोलताना सौरव दास यांनी दिल्ली पोलीस आणि केंद्र सरकारच्या कारभारावर गंभीर प्रश्न उपस्थित केले. “आमच्या विरोधात दिल्ली पोलिसांकडून अनेक नोटिसा पाठवण्यात आल्या असून आंदोलकांवर कोठडीत हिंसाचार केला जात आहे. अशा वेळी राष्ट्रीय मानवाधिकार आयोग (NHRC) आणि सर्वोच्च न्यायालय गप्प का आहेत?” असा सवाल त्यांनी केला. विविध राज्यांतून आलेल्या आंदोलकांना मुद्दाम हिंसाचार भडकवण्यासाठी गाड्यांमध्ये भरून आणल्याचे चित्र निर्माण केले जात आहे. निष्पक्ष वार्तांकन करणाऱ्या स्वतंत्र पत्रकारांविरुद्ध सरकार युद्ध पुकारत असून, ही देशातील पत्रकारितेसाठी एकप्रकारे आणीबाणीचीच परिस्थिती असल्याचे ते म्हणाले.

याच वेळी त्यांनी दिल्लीतील ऐतिहासिक गुरुद्वारा बांगला साहिबमध्ये घडलेल्या घटनेचा तीव्र निषेध नोंदवला. आंदोलकांना आश्रय दिलेल्या गुरुद्वारात दिल्ली पोलिसांचे जवान बूट घालून, डोके न झाकता आणि शस्त्रास्त्रांसह आत घुसले, असा आरोप दास यांनी केला. “ज्या शीख बांधवांनी कधीही भेदभाव न करता लोकांना आश्रय दिला, त्यांचा असा अनादर करणे अत्यंत दुर्दैवी आहे,” असे सांगत त्यांनी शीख समुदायाला या अन्यायाविरोधात एकत्र येण्याचे आवाहन केले.

“ज्ञानेश कुमार यांच्याकडे कोणती गुप्त माहिती आहे?” — सौरव दास यांचा थेट सवाल

केंद्र सरकार संपूर्ण यंत्रणा पणाला लावून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना का वाचवत आहे, यावर सौरव दास यांनी गंभीर शंका उपस्थित केली. “ज्ञानेश कुमार यांच्याकडे पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांच्याबद्दल अशी कोणती गुप्त माहिती आहे, ज्यामुळे सरकार स्वतःच्याच नागरिकांविरुद्ध युद्ध पुकारत आहे? त्यांच्यावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा (RSS) काही दबाव आहे का? 2024 च्या लोकसभा निवडणुकीत वाराणसी मतदारसंघाचे निकाल जाहीर होत असताना सुरुवातीला नरेंद्र मोदी माघारले होते आणि नंतर अचानक आघाडीवर आले; याबद्दल ज्ञानेश कुमार यांना काही ठाऊक आहे का?” असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केला.

हेही वाचा – सर्वोच्च न्यायालयाचा दिल्ली पोलिसांना मोठा झटका; बॅरिकेड्स हटवण्यासह दिले ‘हे’ महत्त्वाचे आदेश

“भारताची आंतरराष्ट्रीय स्तरावर बदनामी” – आशुतोष रांका

पत्रकार परिषदेत बोलताना पक्षाचे नेते आशुतोष रांका यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर सडकून टीका केली. “भारताच्या इतिहासात नरेंद्र मोदी यांच्यासारखा भित्रा पंतप्रधान देशाने कधीही पाहिला नाही. मागील दोन-तीन दिवसांत निर्माण झालेल्या या अभूतपूर्व परिस्थितीमुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची मोठी बदनामी झाली आहे,” असे ते म्हणाले. आंदोलकांना आणि नेत्यांना विमानातूनच बेकायदेशीररीत्या किडनॅप करण्यात आले. देशात आजवर केवळ आणीबाणीविषयी ऐकले होते, परंतु सध्याची परिस्थिती प्रत्यक्षात आणीबाणीपेक्षाही भयावह असल्याचे सांगत त्यांनी सरकारविरोधातील लढा असाच सुरू राहील, असा निर्धार व्यक्त केला.

Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number