Monday, June 23, 2025 11:27:12 AM

Boycott Turkey: भारत तुर्कीकडून कोणत्या वस्तू आयात करतो? बहिष्कारानंतर हॉटेल्समधील 'या' पदार्थांची मागणी कमी होण्याची शक्यता

आता देशात बॉयकॉट टर्किए हा हॅशटॅग सुरू झाला आहे. यामुळे, भविष्यात तुर्कीहून भारतात येणाऱ्या इतर वस्तूंवर बंदी येऊ शकते. सध्या, भारतात अनेक तुर्की पदार्थ खूप लोकप्रिय आहेत.

boycott turkey भारत तुर्कीकडून कोणत्या वस्तू आयात करतो बहिष्कारानंतर हॉटेल्समधील या पदार्थांची मागणी कमी होण्याची शक्यता
Boycott Turkey
Edited Image

नवी दिल्ली: भारताविरुद्धच्या युद्धात तुर्कीने पाकिस्तानला पाठिंबा दिला, त्यानंतर भारतात तुर्कीयेवर बहिष्कार सुरू झाला आहे. सुरुवातीला व्यापाऱ्यांनी तुर्की येथून सफरचंद आणि संगमरवरी आयात न करण्याचा निर्णय घेतला. आता देशात बॉयकॉट टर्किए हा हॅशटॅग सुरू झाला आहे. यामुळे, भविष्यात तुर्कीहून भारतात येणाऱ्या इतर वस्तूंवर बंदी येऊ शकते. सध्या, भारतात अनेक तुर्की पदार्थ खूप लोकप्रिय आहेत. या बहिष्कारानंतर, हॉटेल्समधील त्यांच्या मागणीवरही परिणाम होऊ शकतो. तुर्कीमधून सध्या भारतात कोणत्या वस्तू भारतात आयात केल्या जातात? ते जाणून घेऊयात.

भारतातील तुर्की वस्तू - 

तुर्कीये येथून भारतात मोठ्या प्रमाणात संगमरवरी आयात केला जातो. भारतात आयात होणाऱ्या 70 टक्के संगमरवरी तुर्कीतून आणला जातो. त्याच वेळी, एनडीटीव्हीच्या अहवालानुसार, तुर्कीमधून दरवर्षी सुमारे 1 लाख 29 हजार 882 मेट्रिक टन सफरचंद आयात केले जातात. पुण्यातील व्यापाऱ्यांनी तुर्कीयेकडून सफरचंद खरेदी करणार नसल्याचे जाहीर केले आहे. याशिवाय, कार्पेट, फर्निचर, हाताने बनवलेल्या सजावटीच्या वस्तू तुर्कीतून भारतात येतात. त्याचप्रमाणे, रेशीम, लिनेन, ऑलिव्ह ऑइल, ड्राय फ्रूट्स, चेरी, मसाले आणि काही हर्बल पेये देखील तुर्कीमधून आयात केली जातात. तुर्कीये येथून औद्योगिक यंत्रसामग्री, बांधकाम उपकरणे आणि कृषी उपकरणे देखील आयात केली जातात.

भारतात कोणता तुर्की पदार्थ प्रसिद्ध आहे?

सध्या भारतात तुर्कीवर बहिष्कार टाकला जात आहे आणि भारतात तुर्की वस्तूंची मोठी मागणी आहे, परंतु दरम्यान, ही मागणी कमी होऊ शकते. तसेच, दिल्लीसह अनेक राज्यांमध्ये तुर्की पदार्थांना मोठी मागणी आहे. काही लोक फक्त या पदार्थांसाठी हॉटेलमध्ये जातात. अशी काही हॉटेल्स देखील आहेत जी फक्त तुर्की पदार्थ बनवतात.

हेही वाचा - मोठी कारवाई! चिनी मुखपत्र 'ग्लोबल टाईम्स'च्या X अकाउंटवर भारतात बंदी

कुनाफा आणि तुर्की कबाब - 

तुर्कियेचा गोड पदार्थ 'कुनाफा' खूप प्रसिद्ध आहे. सोशल मीडियामुळे कुनाफाचा ट्रेंड अधिक ठळक झाला आहे. गेल्या काही दिवसांत, अशी अनेक हॉटेल्स उघडली आहेत जिथे कुनाफा उपलब्ध आहे. कुनाफाच्या आधी, तुर्की कबाब दिल्लीत खूप लोकप्रिय होते. हे कबाब खूप मसालेदार आणि तिखट असतात आणि लोकांना त्यांची चव खूप आवडते.

हेही वाचा - पाकिस्तानशी मैत्री भोवली! सफरचंदानंतर आता तुर्कीतून येणाऱ्या 'मार्बल'वर बंदी

'टर्किश टी' - 

दिल्लीतील शाहीन बागेबद्दल बोलायचे झाले तर, येथील 'टर्किश टी', 'कुनाफा' आणि 'टर्किश कबाब' खूप प्रसिद्ध आहेत. त्यांचा आस्वाद घेण्यासाठी लोक दूरदूरून येथे येतात. जर इस्रायलप्रमाणे तुर्कीवर बहिष्कार टाकला गेला तर हॉटेल्समध्ये या पदार्थांची मागणी कमी होण्याची शक्यता आहे. 
 


सम्बन्धित सामग्री