Sunday, March 08, 2026 11:23:51 PM

Wild Elephant Viral Video : शहरात जंगली हत्तीचा थरार! नागरिकांची धावपळ; वाढता मानव-वन्यजीव संघर्ष चिंताजनक

या भागात हत्तींचा वावर असणे नवीन नाही, मात्र तो रहिवासी भागात शिरल्याने चिंता वाढली आहे. येथील मानव-हत्ती संघर्षाची परिस्थिती सध्या गंभीर बनली आहे.

wild elephant viral video  शहरात जंगली हत्तीचा थरार नागरिकांची धावपळ वाढता मानव-वन्यजीव संघर्ष चिंताजनक

Wild Elephant : झारखंडची राजधानी रांचीमध्ये शुक्रवारी सकाळी एका जंगली हत्तीने शहरात प्रवेश केल्याने एकच खळबळ उडाली. रहिवासी भागात अचानक हत्ती दिसल्याने नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले असून, प्रशासनाने तातडीने बचाव कार्य सुरू केले आहे. वन विभागाच्या पथकाने शर्थीचे प्रयत्न करत हत्तीला शहराबाहेर काढण्यात यश मिळवले आहे. यानंतर नागरिकांनी शांतता राखावी, अफवांवर विश्वास ठेवू नये आणि वन विभागाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. 

सकाळी 5 वाजता शहरात एन्ट्री
वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, हा जंगली हत्ती शुक्रवारी सकाळी सुमारे 5:00 वाजता 'नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ॲडव्हान्स्ड मॅन्युफॅक्चरिंग टेक्नॉलॉजी' जवळ पहिल्यांदा पाहण्यात आला. त्यानंतर हा हत्ती हवाई नगर परिसरात फिरू लागला. सकाळची वेळ असल्याने आणि शाळा उघडण्याची वेळ जवळ आल्याने मुलांच्या सुरक्षिततेसाठी विशेष दक्षता घेतली जात आहे. रांचीचे विभागीय वन अधिकारी (DFO) श्रीकांत वर्मा यांनी सांगितले की, हा हत्ती आपल्या नैसर्गिक मार्गावरून भटकटल्यामुळे किंवा कळपातून चुकल्यामुळे गोंधळून शहरात आला असावा.

हेही वाचा - Kuno Cheetah : चित्त्यांसाठी रोज 35 हजारांचे मांस; वर्षाचा खर्च 1.27 कोटी; तरीही चित्ते गावात का पोहोचतात?

नेहमीचा मार्ग सोडून वस्तीत शिरकाव
या भागात हत्तींचा वावर असणे नवीन नाही, मात्र तो रहिवासी भागात शिरल्याने चिंता वाढली आहे. सामान्यतः हत्ती हल्हू वनक्षेत्रातून निघून धुर्वा डॅमपर्यंत पोहोचतात. मात्र, यावेळी हत्ती थेट शहराच्या अंतर्गत भागात घुसल्याने लोकांमध्ये दहशत पसरली आहे. वन विभागाचे पथक हत्तीच्या प्रत्येक हालचालीवर नजर ठेवून असून, त्याला कोणत्याही प्रकारची इजा न पोहोचवता पुन्हा जंगलाकडे वळवण्याचा प्रयत्न करत आहेत. सध्या हत्तीला शहराबाहेर नेण्यात यश आले आहे. नागरिकांना हत्तीच्या जवळ न जाण्याचे आणि त्याला न त्रास देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

राज्यात हत्तींच्या हल्ल्यात 27 जणांचा मृत्यू
झारखंडमधील मानव-हत्ती संघर्षाची परिस्थिती सध्या गंभीर बनली आहे. झारखंडमध्ये वनक्षेत्रावर होणारे मानवी अतिक्रमण आणि अन्नाच्या शोधात हत्तींचा मानवी वस्तीत होणारा शिरकाव ही एक मोठी समस्या बनली असून, त्यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्याची गरज व्यक्त होत आहे. सरकारी आकडेवारीनुसार, गेल्या काही महिन्यांत रामगड, बोकारो, हजारीबाग, चाईबासा, जमशेदपूर, लोहरदगा, गुमला आणि दुमका यांसारख्या जिल्ह्यांमध्ये हत्तींच्या हल्ल्यात सुमारे 27 लोकांचा बळी गेला आहे. मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनीही या वाढत्या घटनांबाबत चिंता व्यक्त केली असून, मानवी आणि वन्यजीव संघर्ष कमी करण्यासाठी प्रभावी योजना तयार करण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले आहेत.

हेही वाचा - India's First Red Striped Road: देशात प्रथमच ! महामार्गावर लाल रंगाचे पट्टे; NHAI ने का बनवला असा रस्ता? वाचा


सम्बन्धित सामग्री