Saturday, May 17, 2025 10:12:47 PM

भारत पाकिस्तानविरुद्ध मोठी कारवाई करणार? हवाई दल प्रमुखांनी घेतली पंतप्रधान मोदींची भेट

भारतीय हवाई दल प्रमुख अमरप्रीत सिंग यांनी रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम हल्ल्यानंतर राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित बाबींवर सिंग यांची मोदींसोबत बैठक झाली.

भारत पाकिस्तानविरुद्ध मोठी कारवाई करणार हवाई दल प्रमुखांनी घेतली पंतप्रधान मोदींची भेट
IAF Chief Air Marshal AP Singh meets PM Modi,
Edited Image

नवी दिल्ली: भारतीय हवाई दल प्रमुख अमरप्रीत सिंग यांनी रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम हल्ल्यानंतर राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित बाबींवर सिंग यांची मोदींसोबत बैठक झाली. ही बैठक अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. शनिवारी याआधी नौदल प्रमुख अ‍ॅडमिरल दिनेश त्रिपाठी यांनीही पंतप्रधान मोदींची भेट घेतली होती. यावेळी त्यांनी नौदलाच्या सध्याच्या तयारी आणि उपक्रमांची माहिती दिली होती.

हेही वाचा -  भारत-पाकिस्तानातील तणाव शिगेला; शस्त्रास्त्र निर्मिती केंद्रातील कर्मचाऱ्यांच्या सर्व सुट्ट्या रद्द

मोदींच्या तिन्ही लष्कर प्रमुखांसोबत स्वतंत्र बैठका - 

पहलगाम हल्ल्यानंतर पंतप्रधान मोदी सतत बैठका घेत आहेत. याआधी पंतप्रधान मोदींनी दोनदा सीसीएस बैठक घेतली आहे. या काळात त्यांनी सैन्याला पूर्ण स्वातंत्र्य दिले. सीसीएस बैठकीव्यतिरिक्त, पंतप्रधान मोदींनी तिन्ही लष्कर प्रमुखांसोबत स्वतंत्र बैठका घेतल्या आहेत.

हेही वाचा -  पाकिस्तानचा थरकाप! राष्ट्रपतींनी मध्यरात्री बोलावले संसदेचे आपत्कालीन अधिवेशन

तिन्ही लष्कर प्रमुखांची स्वतंत्रपणे भेट -  

दरम्यान, 22 एप्रिल रोजी पहलगाम हल्ल्यानंतर, पंतप्रधान मोदींनी 26 एप्रिल रोजी पहिल्यांदाच सीसीएस बैठक घेतली. या बैठकीला संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल, संरक्षण प्रमुख अनिल चौहान आणि तिन्ही लष्कर प्रमुख उपस्थित होते. ही बैठक सुमारे दीड तास चालली, ज्यामध्ये पंतप्रधान मोदींनी सैन्याला पाकिस्तानविरुद्ध कारवाई करण्याचे स्वातंत्र्य दिले. यानंतर, 30 एप्रिल रोजी लष्करप्रमुख उपेंद्र द्विवेदी यांनी पंतप्रधान मोदींची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. यावेळी परराष्ट्र मंत्री आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार देखील उपस्थित होते.
 


सम्बन्धित सामग्री