Muhurat Trading 2025: दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर शेअर बाजारात सोमवारी उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. गुंतवणूकदारांनी उत्साही खरेदी केली. विशेषतः सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या शेअर्समध्ये जोरदार वाढ दिसून आली. आयटी क्षेत्रातील शेअर्समध्येही बाजारात सकारात्मक हालचाल दिसली. तरीही, अनेक गुंतवणूकदारांमध्ये एकच प्रश्न पडला आहे की, यावर्षी दिवाळीच्या मुहूर्त ट्रेडिंगमध्ये शेअर बाजार तेजी असेल का?
मुहूर्त ट्रेडिंग सत्र कधी आहे?
दरवर्षी दिवाळीच्या दिवशी आयोजित केले जाणारे विशेष मुहूर्त ट्रेडिंग सत्र यावेळी मंगळवार, 21 ऑक्टोबर 2025 रोजी आयोजित केले जाणार आहे. यंदा या सत्राचे वेळापत्रक दिवसा ठेवण्यात आले आहे. पारंपरिकरित्या, मुहूर्त ट्रेडिंग सत्र रात्री आयोजित केले जात असे. मात्र, बाजार विश्लेषकांच्या मते, दिवसा सत्र असले तरीही बाजारात तेजी दिसण्याची शक्यता अधिक आहे.
हेही वाचा - Rekha Jhunjhunwala : रेखा झुनझुनवालाने काही मिनिटांत कमावले 67 कोटी; 'या' शेअर्समुळे झाला मोठा नफा
मुहूर्त ट्रेडिंग सत्राची वेळ
मुहूर्त ट्रेडिंग सत्र मुंबई स्टॉक एक्सचेंज (BSE) आणि राष्ट्रीय स्टॉक एक्सचेंज (NSE) दोन्ही ठिकाणी दुपारी होईल. बाजार दुपारी 1:30 वाजता प्री-ओपन होईल, उघडण्याची वेळ दुपारी 1:45 वाजता आहे आणि सत्र दुपारी 2:45 वाजता समाप्त होईल. NSE आणि BSE यांनी स्पष्ट केले आहे की, मुहूर्त ट्रेडिंग सत्रादरम्यान केलेले सर्व व्यवहार नियमित सेटलमेंट नियमांनुसार पूर्ण होतील.
हेही वाचा - चर्चा तर होणारच! दोघांच्या वयात तब्बल 50 वर्षांचं अंतर; इथे वराला नाही तर वधुला मिळाला 1.8 कोटींचा हुंडा, का? ते वाचा
दिवाळीच्या दिवशी बाजाराची कामगिरी
सोमवारीच्या व्यवहारादरम्यान सेन्सेक्सने 700 अंकांची जोरदार वाढ दाखवली, तर निफ्टी 50 निर्देशांकाने 25,926 चा इंट्राडे उच्चांक गाठला. दोन्ही निर्देशांकांनी 52 आठवड्यांचा नवा विक्रम प्रस्थापित केला. गुंतवणूकदारांसाठी ही वाढ म्हणजे दिवाळीची विशेष भेट होती. तथापि, मुहूर्त ट्रेडिंगची प्रतीक्षा करणाऱ्यांना आणखी एक दिवस वाट पाहावा लागणार आहे, कारण बाजाराचा खरा उत्साह आणि खरेदीच्या संधी मंगळवारी पाहायला मिळणार आहे. दरम्यान, दरवर्षी मुहूर्त ट्रेडिंगमुळे बाजारात उत्साह निर्माण होतो. विशेषतः सणासुदीच्या काळात गुंतवणूकदारांच्या खरेदीने बाजाराला सकारात्मक दिशा मिळते. या वर्षी दिवसा होणारे सत्र ट्रेडिंगसाठी नवे अनुभव देईल.
(Disclaimer: शेअर बाजारातील गुंतवणूक जोखमीची आहे. नियम व अटी काळजीपूर्वक वाचा. जय महाराष्ट्र कोणत्याही नफ्या-तोट्यास जबाबदार नाही. गुंतवणुकीपूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्या!)