CBSE Revaluation Vs Verification: मार्क्स वाढवायचेत? मग ‘व्हेरिफिकेशन’ आणि ‘रिव्हॅल्युएशन’मधील फरक आधी समजून घ्या; अन्यथा होईल नुकसान

सीबीएसई निकालानंतर कमी गुण आल्यास विद्यार्थ्यांसमोर व्हेरिफिकेशन, उत्तरपत्रिकेची फोटोकॉपी आणि रिव्हॅल्युएशन असे पर्याय उपलब्ध असतात.

CBSE Revaluation Vs Verification: मार्क्स वाढवायचेत? मग ‘व्हेरिफिकेशन’ आणि ‘रिव्हॅल्युएशन’मधील फरक आधी समजून घ्या; अन्यथा होईल नुकसान

नवी दिल्ली: सीबीएसईचा निकाल लागल्यानंतर अनेक विद्यार्थ्यांच्या घरात आनंदाचे वातावरण असते, तर काही विद्यार्थ्यांना अपेक्षेपेक्षा कमी गुण मिळाल्याने निराशाही वाटते. अनेकदा विद्यार्थ्यांना वाटते की पेपर चांगला लिहिला होता, तरीही गुण कमी कसे आले? अशा वेळी विद्यार्थी आणि पालकांच्या मनात सर्वात मोठा प्रश्न निर्माण होतो, गुणांची मार्क्स पडताळणी (Verification) करावी की पुनर्मूल्यांकन (Revaluation)? अनेकजण या दोन्ही प्रक्रिया एकच असल्याचे समजतात, पण प्रत्यक्षात त्यांच्यात मोठा फरक आहे. योग्य पर्याय न निवडल्यास वेळ आणि पैसे दोन्ही वाया जाऊ शकतात.

मार्क्स व्हेरिफिकेशन या प्रक्रियेत बोर्ड उत्तरपत्रिका पुन्हा तपासत नाही, तर केवळ काही तांत्रिक बाबींची पडताळणी करतो. त्यामध्ये सर्व प्रश्नांच्या गुणांची बेरीज (Totaling) योग्य झाली आहे का, उत्तरपत्रिकेत एखादा प्रश्न तपासायचा राहिला आहे का आणि आत दिलेले गुण मुख्य मार्कशीटवर योग्य प्रकारे छापले आहेत का, याची खात्री केली जाते. म्हणजेच या टप्प्यात विद्यार्थ्याचे उत्तर पुन्हा वाचून गुण दिले जात नाहीत, तर फक्त गणितातील किंवा नोंदीतील चुका तपासल्या जातात.

व्हेरिफिकेशननंतर पुढील महत्त्वाचा टप्पा म्हणजे स्वतःच्या उत्तरपत्रिकेची फोटोकॉपी मागवणे. ही प्रक्रिया विद्यार्थ्यांसाठी अत्यंत उपयुक्त ठरते. उत्तरपत्रिका मिळाल्यानंतर विद्यार्थ्यांना शिक्षकांनी कुठे गुण कापले, कोणत्या उत्तराला कमी गुण दिले किंवा कोणत्या भागावर कमी मार्किंग झाले आहे हे स्पष्टपणे पाहता येते. त्यामुळे पुढे पुनर्मूल्यांकनासाठी अर्ज करायचा की नाही, याचा निर्णय घेणे अधिक सोपे होते.

हेही वाचा: Gudi Padwa 2026: घरात गुढी उभारताना कोणत्या गोष्टी कराव्यात आणि कोणत्या टाळाव्यात, जाणून घ्या योग्य पद्धत

रिव्हॅल्युएशन ही या प्रक्रियेतील अंतिम आणि महत्त्वाची पायरी मानली जाते. यात विद्यार्थी एखाद्या विशिष्ट प्रश्नाच्या मूल्यमापनावर आक्षेप घेतो. जर विद्यार्थ्याला वाटत असेल की उत्तर योग्य असूनही कमी गुण देण्यात आले आहेत, तर त्या प्रश्नाचे पुन्हा मूल्यमापन केले जाते. मात्र या प्रक्रियेत गुण वाढण्याची शक्यता असतेच, पण काही वेळा गुण कमीही होऊ शकतात. त्यामुळे पूर्ण खात्री झाल्यानंतरच हा पर्याय निवडणे योग्य मानले जाते.

जर गुणांची बेरीज करताना किंवा नोंदी करताना तांत्रिक चूक झाल्याचा संशय असेल, तर व्हेरिफिकेशन हा पर्याय निवडणे योग्य ठरते. पण जर उत्तर चांगले असूनही कमी गुण मिळाल्याची खात्री वाटत असेल, तर आधी उत्तरपत्रिकेची फोटोकॉपी मागवून त्यानंतर रिव्हॅल्युएशनसाठी अर्ज करणे अधिक सुरक्षित पर्याय मानला जातो.

या सर्व प्रक्रियांसाठी विद्यार्थ्यांना सीबीएसईच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन ठरावीक कालावधीत अर्ज करावा लागतो. प्रत्येक टप्प्यासाठी निश्चित शुल्क भरावे लागते. महत्त्वाचे म्हणजे बोर्डाने जाहीर केलेल्या अंतिम तारखेच्या आतच अर्ज करणे आवश्यक असते, कारण मुदत संपल्यानंतर कोणतीही संधी दिली जात नाही. त्यामुळे निकालानंतर जाहीर होणाऱ्या वेळापत्रकावर विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी विशेष लक्ष ठेवणे गरजेचे ठरते.

हेही वाचा: Nana Patole: गॅस तुटवड्यावरून राजकारण तापलं! सुप्रिया सुळेंनंतर आता नाना पटोलेंचा सरकारवर हल्लाबोल; सभागृहात मुख्यमंत्र्यांना जाब विचारणार

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number