Crude Oil Price : ज्याची भीती होती तेच झालं! ट्रम्प यांच्या धमकीनंतर कच्च्या तेलाच्या दरात मोठी वाढ; पेट्रोल-डिझेलच्या दरांनी वाढवली धाकधूक

आंतरराष्ट्रीय बाजारातून मोठी बातमी समोर आली आहे. पश्चिम आशियातील तणाव पुन्हा वाढत असून यांचा गंभीर परिणाम भारतासह अन्य देशांवरही होत आहे. 

Crude Oil Price : ज्याची भीती होती तेच झालं! ट्रम्प यांच्या धमकीनंतर कच्च्या तेलाच्या दरात मोठी वाढ; पेट्रोल-डिझेलच्या दरांनी वाढवली धाकधूक

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिका इराणवरील हल्ले थांबवत असल्याची घोषणा केल्यानंतर जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीमध्ये मोठी घसरण झाली. मात्र आंतरराष्ट्रीय बाजारातून मोठी बातमी समोर आली आहे. पश्चिम आशियातील तणाव पुन्हा वाढत असून यांचा गंभीर परिणाम भारतासह अन्य देशांवरही होत आहे. 

एकीकडे इराणवरील हल्ले थांबवत असल्याची घोषणा करणारे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आता इराणला थेट लष्करी कारवाईचा इशारा दिला आहे. इराणने जॉर्डनमधील अमेरिकन लष्करी तळावर हल्ला केल्यानंतर अमेरिका आणि सौदी अरेबियाने इराकमधील इराणसमर्थक गटांवर संयुक्त हवाई कारवाई केली. या घडामोडींमुळे जागतिक तेलपुरवठ्याबाबत चिंता वाढली.

हेही वाचा- Cheap thailand tour package: स्वस्तात मस्त परदेशवारी पडली महागात; 3 भारतीयांचे अपहरण करून 70 लाखांची खंडणी मागितली

त्यानंतर जागतिक तेलबाजारात खळबळ माजली असून कच्च्या तेलाच्या किमतींनी मोठी उसळी मारल्याचे पाहायला मिळत आहे. कच्च्या तेलाची प्रति बॅरलची किंमत ही 90 डॉलरच्या पुढे जाऊन पोहोचली. बुधवारी कच्च्या तेलाच्या किमतीत 7.68 टक्क्यांची वाढ होऊन त्या 90.54 डॉलर प्रति बॅरलवर पोहोचल्या. येमेनमधील हूती बंडखोर दक्षिण लाल समुद्रातून जाणाऱ्या व्यापारी जहाजांकडून शुल्क आकारण्याचा विचार करत आहेत.

तसेच चीनने आपल्या तेलवाहू जहाजांच्या सुरक्षित प्रवासासाठी हूती गटाशी थेट चर्चा केल्याचेही वृत्त समोर आलं आहे. त्यामुळे तणाव कमी झाला तरी कच्च्या तेलाच्या किमती 80 डॉलर प्रति बॅरलच्या खाली जाण्याची शक्यता सध्या तरी कमीच आहे. यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला पुन्हा मोठी झळ बसणार आहे. कच्च्या तेलानंतर आता इंधनाच्या दरातही वाढ होणार का? याकडे सर्वसामान्यांचे लक्ष लागलं आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number