Thailand Cheap Tour Package: स्वस्तात मस्त परदेशवारी पडली महागात; 3 भारतीयांचे अपहरण करून 70 लाखांची खंडणी मागितली

थायलंडमध्ये फिरायला जाण्याचे अनेकांचे स्वप्न असते. थायलंडची स्वस्तात सहल घडवून आणण्याचे आमिष दाखवून तीन भारतीय नागरिकांचे अपहरण करण्यात आल्याची घटना समोर आली आहे.

Thailand Cheap Tour Package: स्वस्तात मस्त परदेशवारी पडली महागात; 3 भारतीयांचे अपहरण करून 70 लाखांची खंडणी मागितली

Indian Tourists Kidnapped in Pattaya Thailand: आंतरराष्ट्रीय पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या थायलंडमध्ये भारतीय पर्यटकांना लक्ष्य करणारी एक नवी आणि भयानक गुन्हेगारी पद्धत समोर आली आहे. कमी खर्चात थायलंड सफरीचे आमिष दाखवून पर्यटकांचे अपहरण करणे आणि त्यांच्या कुटुंबाकडून खंडणी उकळणे असे प्रकार आता घडू लागले आहेत. पट्टाया येथे अशाच प्रकारे 3 भारतीय तरुणांना बंधक बनवून त्यांचा अमानुष छळ करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. थाई पोलिसांनी वेळेवर कारवाई करत या तिघांची सुरक्षित सुटका केली असून, या रॅकेटमधील 5 भारतीय आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत.

स्वस्त टूर पॅकेजचे आमिष अन् पट्टायामध्ये अपहरण
बँकॉक येथील एका दैनिकाने दिलेल्या वृत्तानुसार, 23 ते 26 वयोगटातील 3 भारतीय तरुणांना थायलंडच्या 7 दिवसांच्या अतिशय स्वस्त सहलीची ऑफर देण्यात आली होती. यासाठी प्रत्येक पीडिताने 70,000 बाथ (अंदाजे 2 लाख रुपये) भरले होते. घटनेची सविस्तर माहिती खालीलप्रमाणे आहे:
– 21 जुलै रोजी हे तिघे तरुण बँकॉकच्या सुवर्णभूमी विमानतळावर उतरले आणि तेथून टॅक्सीने पट्टाया येथे पोहोचले.
– सुखुमवित महामार्गावरील एका फास्ट-फूड हॉटेलमध्ये एका भारतीय व्यक्तीने त्यांना गाठले आणि दुचाकीवरून भाड्याच्या खोलीत नेले.
– तिथे आधीपासूनच असलेल्या भारतीय आणि पाकिस्तानी नागरिकांनी या तिघांचे अपहरण करून त्यांना ओलीस ठेवले.
– बँग लामंग जिल्ह्यातील एका दुमजली घरातील 2 बेडरूममध्ये या तरुणांना जवळपास आठवडाभर डांबून ठेवण्यात आले होते.

दररोज अमानुष छळ आणि 70 लाखांची खंडणी
ओलीस ठेवलेल्या तरुणांचा छळ करून भारतात त्यांच्या कुटुंबीयांकडून तब्बल 70 लाख रुपयांच्या खंडणीची मागणी केली जात होती. पोलिसांनी 27 जुलै रोजी या घरावर धाड टाकली तेव्हा हे तिघेही तरुण साखळदंडांनी बांधलेल्या अवस्थेत आढळले. त्यांना उलटे टांगून रोज मारहाण केली जात होती, जेवण दिले जात नव्हते आणि त्यांच्या घोट्यावर कठीण वस्तूने प्रहार केले जात होते. पोलिसांच्या सतर्कतेमुळे या तरुणांची वेळेवर सुटका झाली.

हेही वाचा – Trainee IPS Officer Arrest: 'खोलीत डांबलं, चाकूने धमकावलं अन् गळा आवळला…'; लैंगिक छळाचा आरोप असलेले IPS अधिकारी उदय कृष्ण रेड्डी पोलिसांच्या ताब्यात

5 भारतीयांना अटक; दुबईतून नेटवर्क आणि क्रिप्टोकरन्सीचा वापर
या प्रकरणात थाई पोलिसांनी अवतार सिंग, जगजीत सिंग, रामबालक कुमार, सुखबीर सिंग आणि कुलरा सिंग या 5 भारतीय नागरिकांना अटक केली आहे. अटकेतील आरोपींनी दिलेल्या माहितीनुसार, एका पाकिस्तानी व्यक्तीने चॅट ॲपद्वारे त्यांच्याशी संपर्क साधून अपहाराचे नियोजन केले होते. या गुन्ह्याचा मुख्य सूत्रधार दुबईत बसून संपूर्ण नेटवर्क चालवत असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. अपहरणकर्त्यांचा मुख्य उद्देश कुटुंबीयांकडून क्रिप्टोकरन्सीच्या माध्यमातून खंडणी उकळण्याचा होता.

पर्यटकांना प्रशासनाचा सतर्कतेचा इशारा
थायलंडमध्ये अशा प्रकारे भारतीय आणि पाकिस्तानी नागरिकांचे सिंडिकेट एकत्र येऊन पर्यटकांची फसवणूक करत असल्याचे या घटनेवरून उघड झाले आहे. यापूर्वी सायबर घोटाळ्यांसाठी पर्यटकांना म्यानमारला पाठवले जात होते, मात्र आता थेट अपहाराचे गुन्हे घडत आहेत. अज्ञात किंवा अत्यंत स्वस्त टूर पॅकेजच्या आमिषाला बळी पडू नये आणि अनधिकृत ट्रॅव्हल एजंट्सपासून सावध राहावे, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.

हेही वाचा – Crime News: लग्नाला नकार दिल्याने प्रियकराचं भयंकर कृत्य; आधी प्रेयसीचा गळा दाबला, नंतर मृतदेहावर पेट्रोल ओतलं अन्…

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number