Women Celebrate Dahi Handi: मुंबई लोकल ट्रेन म्हणताच गर्दी, ताण-तणाव, भांडण व हाणामाऱ्या यांचं दृश्य आपल्या डोळ्यांसमोर उभं राहतं. परंतु हा विचार महिला प्रवाशांनी खोडून काढला आहे, भजन-कीर्तनांसोबतच आता गोपाळकाला देखील लोकल डब्यात साजरा केला जाऊ शकतो हे दाखवून दिले. यात त्यांनी ट्रेनमधील महिला डब्याची फुगे, पताके लावून आकर्षक सजावट केली. हँडल्सच्या साहाय्याने छोटीशी हंडी बांधली, ज्यात फुलांचा समावेश होता.
Dahi Handi celebration inside Mumbai Local train pic.twitter.com/XJcM6w5T5f — Mumbai Heritage (@mumbaiheritage) September 4, 2026
हा प्रकार बदलापूर ते ठाणे दरम्यान धावणाऱ्या सकाळी 7:56 च्या लोकल ट्रेनमधील असल्याचे सांगितले जात आहे. यात सजावटीबरोबर गोविंदाची गाणी लावून त्यावर नाचत जल्लोष देखील केला. त्यानंतर या महिलांनी एक थराचा मानवी मनोरा रचत छान अशी दहीहंडी फोडली. या सुंदरशा मुंबई लोकलमधील साजरा केलेला गोपाळकालाचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
रोजच्या दगदगीच्या जीवनात उत्सवाचे क्षण साजरे करण्यासाठी जागा आणि वेळ यांची कोणतीच मर्यादा नसते, हे या महिलांनी दाखवून दिले. काल जागोजागी दहीहंडीनिमित्त मानवी मनोऱ्यांचे कडक 7, 8 व 9 ते 10 थर यशस्वीरीत्या रचले गेले. याबरोबरच धावत्या लोकलमध्ये देखील महिलांनी मोठ्या उत्साहात अशी वेगळ्याप्रकारे दहीहंडी हा सण साजरा केला.