Germany Shocker: रुग्णालयात काम वाढल्याने फिरलं नर्सचं डोकं! प्राणघातक औषधांचे इंजेक्शन देऊन घेतला 10 रुग्णांना जीव

कामाच्या ताणामुळे कंटाळलेल्या या नर्सने आपल्या रात्रीच्या ड्युटीदरम्यान 10 रुग्णांना प्राणघातक इंजेक्शन देऊन संपवलं. तसेच आणखी 27 जणांना मारण्याचा प्रयत्न केला.<br/>

Germany Shocker: रुग्णालयात काम वाढल्याने फिरलं नर्सचं डोकं! प्राणघातक औषधांचे इंजेक्शन देऊन घेतला 10 रुग्णांना जीव

Germany Shocker: जर्मनीतील वुरसेलेन (Wurselen) शहरात घडलेल्या एका भीषण घटनेने संपूर्ण जगाला हादरवले आहे. रुग्णांची सेवा करण्याची शपथ घेतलेल्या एका परिचारिकेने रुग्णालयातच मृत्यूचा खेळ रचला. कामाच्या ताणामुळे कंटाळलेल्या या नर्सने आपल्या रात्रीच्या ड्युटीदरम्यान 10 रुग्णांना प्राणघातक इंजेक्शन देऊन संपवलं. तसेच आणखी 27 जणांना मारण्याचा प्रयत्न केला.

प्राणघातक औषधांचे इंजेक्शन देऊन केली हत्या

ही घटना डिसेंबर 2023 ते मे 2024 दरम्यान पश्चिम जर्मनीतील एका रुग्णालयात घडली. तपासात उघड झाले की, नर्सने वृद्ध आणि आजारी रुग्णांना झोप लवकर यावी आणि तिला रात्री कमी काम करावे लागावे, या हेतूने मॉर्फिन आणि मिडाझोलमचे अत्याधिक डोस दिले. ही औषधे इतकी शक्तिशाली आहेत की, चुकीच्या डोसने मृत्यू होऊ शकतो.

हेही वाचा – भाजीविक्रेत्याचं नशिब पालटलं!; तिकिटासाठी पैसे उसने घेतले अन् जिंकली 11 कोटींची लॉटरी

नर्सला जन्मठेपेची शिक्षा  

या प्रकरणात न्यायालयाने नर्सला जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे आणि 15 वर्षांनंतरही तिला सुटकेची संधी न देण्याचे निर्देश दिले आहेत. न्यायाधीशांनी हा गुन्हा “अत्यंत गंभीर” असल्याचे नमूद केले. तथापि, आरोपीला या निर्णयाविरुद्ध अपील करण्याचा अधिकार राहील. दरम्यान, तपास यंत्रणा आता या शक्यतेचा शोध घेत आहे की, तिने यापेक्षा अधिक रुग्णांचा जीव घेतला का. यासाठी काही मृतदेह बाहेर काढून त्यांची पुन्हा तपासणी केली जात आहे. जर नवीन पुरावे समोर आले, तर तिच्यावर दुसरा खटला चालवला जाऊ शकतो.

हेही वाचा – Viral Video : राहुल गांधींनी दाखवलेल्या ब्राझिलियन मॉडेलचा व्हिडिओ व्हायरल; म्हणाली, 'काय वेडेपणा आहे'

नील्स होगेल प्रकरणाची आठवण

ही घटना जर्मनीतील कुख्यात नील्स होगेल प्रकरणासारखीच आहे. नील्स होगेल या आणखी एका परिचारकाला 1999 ते 2005 दरम्यान 85 रुग्णांच्या हत्येसाठी जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आली होती. त्या प्रकरणानंतर आता पुन्हा अशीच घटना घडल्याने जर्मन आरोग्य व्यवस्था आणि सुरक्षा व्यवस्थेबद्दल गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number