EPFO New App: PF काढण्याची प्रक्रिया पूर्ण बदलणार! EPFO च्या नव्या ॲपमुळे काही मिनिटांत मिळणार पैसे

ईपीएफओ लवकरच नवीन मोबाईल ॲप लॉन्च करणार असून यामुळे पीएफ काढण्याची प्रक्रिया अधिक सोपी आणि जलद होणार आहे यूपीआयच्या माध्यमातून काही मिनिटांत पैसे खात्यात ट्रान्सफर होणार आहेत

EPFO New App: PF काढण्याची प्रक्रिया पूर्ण बदलणार! EPFO च्या नव्या ॲपमुळे काही मिनिटांत मिळणार पैसे

EPFO New App: भारतातील कोट्यवधी नोकरदारांसाठी एक मोठी दिलासादायक बातमी समोर येत आहे. कर्मचारी भविष्य निधी संघटना म्हणजेच Employees' Provident Fund Organisation (EPFO) लवकरच एक नवं मोबाईल ॲप लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. या ॲपमुळे पीएफ (PF) काढण्याची प्रक्रिया पूर्वीपेक्षा अधिक जलद, सोपी आणि पूर्णपणे डिजिटल होणार आहे.

सध्या पीएफ काढण्यासाठी ऑनलाइन पोर्टलवर जाऊन अर्ज करावा लागतो. या प्रक्रियेत अनेक टप्पे पार करावे लागतात आणि पैसे खात्यात जमा होण्यासाठी काही दिवस प्रतीक्षा करावी लागते. मात्र नवीन ॲपमुळे ही संपूर्ण प्रक्रिया काही मिनिटांत पूर्ण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे कर्मचारी वर्गाला मोठा दिलासा मिळणार आहे.

हेही वाचा: LPG and PNG Price : गॅस सिलिंडर करमुक्त होणार? घरगुती LPG आणि PNG 'टॅक्स फ्री' झाल्यास किती पैसे वाचतील, जाणून घ्या

या ॲपचं सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये Unified Payments Interface (यूपीआय) प्रणालीचा वापर करण्यात येणार आहे. यामुळे वापरकर्ते थेट आपल्या बँक खात्यात पैसे ट्रान्सफर करू शकतील. तसेच हे ॲप विविध यूपीआय ॲप्सशी जोडले जाणार असल्याने व्यवहार अधिक सोपे होतील. आधी पीएफचे पैसे बँकेत ट्रान्सफर करून नंतर काढावे लागत होते, मात्र आता ही प्रक्रिया अधिक जलद आणि सहज होईल.

नवीन सुविधेनुसार, कर्मचारी त्यांच्या पीएफ खात्यातील 75 टक्क्यांपर्यंत रक्कम काढू शकतील. मात्र उर्वरित 25 टक्के रक्कम खात्यात ठेवणे बंधनकारक असेल. हा नियम फंड सुरक्षित ठेवण्यासाठी लागू करण्यात आला आहे. नोकरी गेल्यास उर्वरित रक्कम काही कालावधीनंतर काढता येईल, अशी माहिती अधिकाऱ्यांकडून देण्यात आली आहे.

सध्या हे ॲप पूर्णपणे लॉन्च झालेले नसले तरी त्याची चाचणी प्रक्रिया पूर्ण झाल्याची माहिती समोर येत आहे. लवकरच ते सर्वांसाठी उपलब्ध होण्याची शक्यता आहे. तोपर्यंत कर्मचारी UMANG App च्या माध्यमातून पीएफ काढण्याची प्रक्रिया पूर्ण करू शकतात. या ॲपद्वारेही अर्ज करणे सोपे असले तरी यूपीआयसारखी जलद सुविधा अद्याप उपलब्ध नाही.

हेही वाचा: Air India चा प्रवास महागणार! 8 एप्रिलपासून विमान तिकिटांच्या दरात मोठी वाढ; जाणून घ्या नवे दर

भारतामध्ये ईपीएफओकडे प्रचंड मोठा निधी जमा असून कोट्यवधी कर्मचारी या योजनेशी जोडलेले आहेत. त्यामुळे या नव्या बदलामुळे संपूर्ण प्रणाली अधिक आधुनिक आणि वापरकर्त्यास अनुकूल होणार आहे.

ईपीएफओचं हे नवं ॲप कर्मचारी वर्गासाठी मोठा बदल ठरणार आहे. काही मिनिटांत पीएफ काढण्याची सुविधा मिळाल्यास आर्थिक अडचणीच्या वेळी लोकांना तात्काळ मदत मिळू शकते. त्यामुळे या ॲपच्या लॉन्चकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number