Shivraj Motegaonkar Viral Video : ‘पेपर फोडणाऱ्यांना फाशी द्या…’; मोटेगावकरांचा ‘तो’ जुना व्हिडीओ व्हायरल, नेटकऱ्यांकडून जोरदार ट्रोल

गेल्या वर्षी दिलेल्या एका मुलाखतीत मोटेगावकर चक्क 'पेपर फोडणाऱ्या गुन्हेगारांना मृत्यूदंडाची किंवा आजन्म कारावासाची शिक्षा द्या' अशी आक्रमक मागणी करताना दिसत आहेत.

Shivraj Motegaonkar Viral Video : ‘पेपर फोडणाऱ्यांना फाशी द्या…’; मोटेगावकरांचा ‘तो’ जुना व्हिडीओ व्हायरल, नेटकऱ्यांकडून जोरदार ट्रोल

Shivraj Motegaonkar Viral Video : नीट UG 2026 पेपरफुटी प्रकरणात ‘रेणुकाई करिअर सेंटर’ (RCC) चे संचालक प्रा. शिवराज मोटेगावकर यांना सीबीआयने (CBI) अटक केल्यानंतर शिक्षण क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे. या हायप्रोफाईल अटकेनंतर आता सोशल मीडियावर मोटेगावकरांचा एक जुना व्हिडिओ तुफान व्हायरल होत असून, नेटकरी त्यांच्या दुटप्पी भूमिकेवर कडाडून टीका करत आहेत. गेल्या वर्षी दिलेल्या एका मुलाखतीत मोटेगावकर चक्क ‘पेपर फोडणाऱ्या गुन्हेगारांना मृत्यूदंडाची किंवा आजन्म कारावासाची शिक्षा द्या’ अशी आक्रमक मागणी करताना दिसत आहेत. ज्या पेपरफुटीविरोधात मोटेगावकर ढसाढसा रडले होते, आज त्याच गुन्ह्यात त्यांना स्वतःला बेड्या पडल्याने हा व्हिडिओ सध्या चर्चेचा केंद्रबिंदू ठरला आहे.

व्हायरल व्हिडिओत नेमकं काय म्हणाले होते मोटेगावकर?
व्हायरल होत असलेल्या जुन्या व्हिडिओमध्ये प्रा. मोटेगावकर कमालीचे भावूक आणि संतप्त झालेले पाहायला मिळत आहेत. नीट 2024 च्या निकालावर भाष्य करताना ते म्हणाले होते, “बिहार, युपीमध्ये पेपर फोडणे हे लोकांचे करिअर झाले आहे. आम्ही इथे 18-18 तास प्रामाणिकपणे शिकवतो. गरीब मायबाप स्वतःचे घरदार, जमीन विकून मुलांना डॉक्टर बनवण्यासाठी आमच्याकडे पाठवतात. अशा पवित्र शिक्षण क्षेत्रात जे कोणी पेपर फोडण्याचे पाप करत असतील, त्यांना थेट मृत्यूदंड किंवा जन्मठेपेचीच शिक्षा झाली पाहिजे.” त्या वेळी महाराष्ट्राच्या शिक्षण पद्धतीचे कौतुक करणारे मोटेगावकर आज स्वतःच सीबीआयच्या आरोपपत्रात पेपरफुटीच्या संघटित टोळीचे ‘सक्रिय सदस्य’ म्हणून नामोन्मुख झाले आहेत.

हेही वाचा – Medical Stores Closed: औषध विक्रेत्यांचा आज देशव्यापी संप! मुंबई, पुण्यासह राज्यातील लाखो मेडिकल बंद, अत्यावश्यक औषधांसाठी काय आहेत पर्याय?

9 दिवसांची सीबीआय कोठडी; दिल्लीत चौकशी सुरू

प्रा. शिवराज मोटेगावकर यांना 17 मे 2026 रोजी तपास यंत्रणेने ताब्यात घेतले होते. दोन दिवस चाललेल्या कसून चौकशीनंतर त्यांना दिल्लीच्या राऊज अव्हेन्यू न्यायालयात हजर करण्यात आले. सीबीआयने या आंतरराज्यीय रॅकेटचा पर्दाफाश करण्यासाठी 10 दिवसांची कोठडी मागितली होती. मात्र दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने मोटेगावकरांना 9 दिवसांची सीबीआय कोठडी सुनावली आहे.

स्वतःच्या मुलासाठीच फोडला पेपर?
शिक्षण वर्तुळात सध्या एक वेगळीच चर्चा रंगली आहे. प्रा. मोटेगावकर हे स्वतः डॉक्टर नसले, तरी त्यांनी आरसीसीच्या माध्यमातून हजारो विद्यार्थ्यांना डॉक्टर बनवले. “मी अनेकांना डॉक्टर केले, पण माझे स्वतःचे मेडिकल कॉलेज नाही, मला ते सुरू करायचे आहे,” अशी इच्छा ते वर्गात बोलून दाखवायचे. आता त्यांनी स्वतःच्या मुलाला वैद्यकीय प्रवेश परीक्षेत पास करण्यासाठीच हे पेपरफुटीचे पाऊल उचलल्याची प्राथमिक चर्चा आहे. या प्रकरणात प्रल्हाद कुलकर्णी नावाच्या दुसऱ्या एका आरोपीचे नाव समोर आले असून, तो थेट मोटेगावकरांच्या संपर्कात होता. त्यामुळे या महाघोटाळ्याचे जाळे देशभरात कुठेकुठे पसरले आहे, याचा शोध आता सीबीआय घेत आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number