Medical Stores Closed: औषध विक्रेत्यांचा आज देशव्यापी संप! मुंबई, पुण्यासह राज्यातील लाखो मेडिकल बंद, अत्यावश्यक औषधांसाठी काय आहेत पर्याय?

देशभरात ऑनलाईन औषध विक्रीच्या वाढत्या प्रभावाविरोधात केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनने आज देशव्यापी बंदची हाक दिली आहे. याला मुंबई, पुणे, ठाणे, नाशिक, आणि नागपूर या शहरांमधून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय.

Medical Stores Closed: औषध विक्रेत्यांचा आज देशव्यापी संप! मुंबई, पुण्यासह राज्यातील लाखो मेडिकल बंद, अत्यावश्यक औषधांसाठी काय आहेत पर्याय?

देशभरात ऑनलाईन औषध विक्रीच्या वाढत्या प्रभावाविरोधात केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनने आज देशव्यापी बंदची हाक दिली आहे. या एकदिवसीय संपाला मुंबई, पुणे, ठाणे, नाशिक, आणि नागपूर यांसारख्या प्रमुख शहरांमधून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचे पाहायला मिळत आहे. आज राज्यातील अनेक शहरात मेडिकल असोसिएशनच्या वतीने कडकडीत बंद पाळत मूक मोर्चा काढण्यात आला असून यावेळी ऑनलाईन औषध खरेदी-विक्रीवर तात्काळ बंदी आणण्यात यावी, अशी आग्रही मागणी केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनने निवेदनाद्वारे प्रशासनाकडे केली आहे. 

यावेळी राज्यातील कोणत्या कोणत्या भागातून किती प्रतिसाद – 

यावेळी इंधन तुटवड्याचा परिणाम आता औद्योगिक वसाहतीमध्ये देखील जाणवू लागला आहे. विविध मागण्यांसाठी ऑल इंडिया केमिस्टच्यावतीने बंदची हाक देण्यात आली असून त्याला पंढरपूर शहर व तालुक्यातील जवळपास 500 औषध विक्रेत्यांनी दुकान बंद ठेवून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. तसेच सातारा जिल्ह्यातील 3200 हून  अधिक  घाउक व किरकोळ औषध विक्रेते सहभागी झाले होते.

बीड जिल्ह्यातील मेडिकल असोसिएशन यांनी हि देशभरातील 12 लाख 50 हजार मेडिकल असोसिएशन बंदला उत्स्फूर्त पाठींबा दिला असून सरकारने तात्काळ आमच्या मागण्या मान्य कराव्यात अन्यथा आम्ही बेमुदत संपावर जाणार असल्याचे मेडिकल असोसिएशन यांच्या वतीने जाहिर करण्यात आले आहे.

हेही वाचा- Adulterated Milk: आरोग्याशी खेळ! 20 लिटरचे काही मिनिटांत 80 लिटर…डिटर्जंट अन् युरियापासून बनवलं जातेय विषारी दूध

हिंगोली जिल्ह्यासह देशभरातील सुमारे साडेबारा लाख औषध दुकाने आज एक दिवसीय बंद ठेवण्यात आली आहेत. अमरावती जिल्ह्यातील सुमारे 2 हजार 700 मेडिकल दुकाने आज बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सर्व दुकाने बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून जिल्ह्यातील शंभर टक्के औषध विक्रेत्याची दुकान बंद आहे.

अहिल्यानगरमधील सुपा एमआयडीसी परिसरात गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलचा तुटवडा निर्माण झाला आहे. वीज खंडित झाल्यानंतर कारखाने चालवण्यासाठी लागणारे जनरेटर आणि अंतर्गत मालवाहतूक करणारी वाहने पेट्रोल डिझेल अभावी बंद बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. यामुळे औद्योगिक उत्पादन प्रक्रिया विस्कळीत होण्याची चिन्हे दिसत आहेत. इंधन टंचाईमुळे कच्चा माल वेळेवर मिळत नसून, वाहतूक खर्च वाढला आहे. तसेच वेळेवर माल न पोहोचल्याने उद्योजकांना मोठा आर्थिक दंड सहन करावा लागत आहे. नवीन उद्योगांची कामेही रखडली असून या समस्येवर मात करण्यासाठी प्रशासनाने एमआयडीसीसाठी गॅस, पेट्रोल आणि डिझेलचा स्वतंत्र कोटा उपलब्ध करून द्यावा अशी मागणी उद्योजकांकडून केली जात आहे.

हेही वाचा- CM Vijay Government : तमिळनाडूत सत्तास्थापनेनंतर लगेचच ठिणगी! 'या' एका कारणामुळे मुख्यमंत्री विजय यांचे सरकार अडचणीत?

औषधाची ऑनलाईन विक्रीच्या विरोधात मेडिकल असोसिएशनने दिलेल्या बंदच्या हाकेला मनमाड, मालेगावसह नाशिक जिल्ह्यात उस्फुर्त प्रतिसाद मिळाला असून सर्वच मेडिकल बंद मध्ये सहभागी होऊन त्यांनी कडकडीत बंद पाळला. ऑनलाईन औषधं विक्री तातडीने बंद करण्यात यावी आणि केंद्र सरकार ने या बाबत काढलेल्या जींआरचे कायद्यात रूपांतर करण्यात यावे या मागण्यासाठी मेडिकल असोसिएशन ने बंद पुकारला आहे.संपामुळे सर्वच मेडिकल स्टोअर्स सकाळ पासून बंद असल्यामुळे औषध मिळत नसल्याने रुग्णाचे मात्र  हाल होत आहे. 

जगन्नाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली होणाऱ्या या देशव्यापी संपात देशभरातील सुमारे 12.5 लाख तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 650 रिटेल औषध विक्रेते सहभागी झालेत. देशातील सध्याच्या 'ड्रग्ज अँड कॉस्मेटिक्स ॲक्ट'मध्ये ऑनलाईन औषध विक्रीबाबत कोणताही कायदेशीर बदल झालेला नाही. त्यामुळे सध्या सुरू असलेली ऑनलाईन औषध विक्री पूर्णपणे बेकायदेशीर असून त्यावर सरकारचे कोणतेही नियंत्रण नाही. ही विक्री त्वरित बंद व्हावी, ही प्रमुख मागणी आहे. आपल्या मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी आज सकाळी 11 वाजल्यापासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यत शांततेच्या मार्गाने 'मोर्चा' काढून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. आज एक दिवसाचा लाक्षणिक दुकाने बंद ठेवत निषेध नोंदवला.

ऑल इंडिया केमिस्ट असोसिएशनने ऑनलाइन औषध विक्रीच्या विरोधात बुधवारी एक दिवसाचा बंद पुकारला. या बंदला रत्नागिरी जिल्ह्यातील मेडिकल चालकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. चिपळूणसह विविध ठिकाणी ऑनलाइन औषध विक्रीविरोधात निदर्शने करण्यात आली. ऑनलाइन विक्रीमुळे स्थानिक मेडिकल व्यवसाय धोक्यात येत असल्याची भूमिका यावेळी मांडण्यात आली. दरम्यान, जिल्हाभरातील बहुतांश मेडिकल दुकाने बंद असल्याचे चित्र पाहायला मिळाले.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number