Monday, March 09, 2026 08:17:29 PM

Small Saving Schemes: PPF, SSY, NSC सह लघु बचत योजनांवर किती व्याज मिळेल? 30 सप्टेंबरला जाहीर होणार नवीन व्याजदर

सध्या, सरकार PPF योजनेवर 7.1 टक्के व्याजदर देते, परंतु यंदा हे व्याजदर सरकार कमी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे हा दर गेल्या 50 वर्षांतील सर्वात कमी पातळी गाठू शकतो.

small saving schemes ppf ssy nsc सह लघु बचत योजनांवर किती व्याज मिळेल 30 सप्टेंबरला जाहीर होणार नवीन व्याजदर

Small Saving Schemes: अर्थ मंत्रालयाने ऑक्टोबर-डिसेंबर 2025 तिमाहीसाठी पोस्ट ऑफिस लघु बचत योजनांसाठी व्याजदर जाहीर करण्याची घोषणा केली आहे. हा निर्णय प्रत्येक तिमाहीत महत्त्वाचा मानला जातो, कारण गुंतवणूकदारांच्या परताव्यावर याचा थेट परिणाम होतो. नवीन दर 1 ऑक्टोबरपासून लागू होतील. सरकार दर तीन महिन्यांनी सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (PPF), सुकन्या समृद्धी योजना (SSY), राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र (NSC), किसान विकास पत्र (KVP), ज्येष्ठ नागरिक बचत योजना (SCSS) आणि इतर पोस्ट ऑफिस योजनांसाठी व्याजदरांचा आढावा घेते. गेल्या सहा तिमाहींपासून हे दर अपरिवर्तित राहिले आहेत. 

हेही वाचा RBI News : रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाचा महत्त्वाचा निर्णय; मृत खातेदारांच्या दाव्यांचे निवारण 15 दिवसांत होणार

सध्या, सरकार PPF योजनेवर 7.1 टक्के व्याजदर देते, परंतु यंदा हे व्याजदर सरकार कमी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे हा दर गेल्या 50 वर्षांतील सर्वात कमी पातळी गाठू शकतो. पोस्ट ऑफिस योजनांचे व्याजदर श्यामला गोपीनाथ समितीच्या शिफारशींनुसार ठरवले जातात. 

हेही वाचा - Gold Price Today: आठवड्याच्या अखेरीस सोनं महागलं; चांदीतही वाढ, ग्राहक चिंतेत

समितीच्या शिफारसीनुसार, सरकारी बाँडवरील उत्पन्नापेक्षा या योजनांचे दर 25 ते 100 बेसिस पॉइंट जास्त असावेत, ज्यामुळे गुंतवणूकदारांसाठी आकर्षक परतावा सुनिश्चित होतो. तथापि, सरकार नेहमीच या शिफारशींचे पालन करत नाही आणि काहीवेळा सामान्य जनतेच्या हितासाठी स्वतःचे निर्णय घेते. ऑक्टोबर-डिसेंबर तिमाहीत व्याजदरात कपात झाली, तर गुंतवणूकदारांसाठी मोठा आर्थिक धक्का ठरू शकतो, तर हे दर वाढले, तर ही चांगली बातमी ठरेल. त्यामुळे आता गुंतवणूकदारांच्या नजरा 30 सप्टेंबरच्या जाहीर निर्णयावर लागल्या आहेत.
 


सम्बन्धित सामग्री