सीतापूर (उत्तर प्रदेश) : आगळ्यावेगळ्या किस्स्यांसाठी उत्तर प्रदेश (Uttar Pradesh) हे नेहमीच चर्चेचा विषय ठरत असते. मग ते क्राईम असो, राजकारण असो वा पर्यटन. पण, आता समोर आलेल्या एका अत्यंत विचित्र तक्रारीमुळे (Bizarre Complaint) तिथल्या प्रशासकीय अधिकाऱ्यांचे आणि पोलिसांचेही डोके पूर्णपणे चक्रावले आहे.
नेमकं काय आहे हे अजब प्रकरण?
उत्तर प्रदेशातील सीतापूर जिल्ह्यातील महमूदाबाद तहसीलमध्ये ही धक्कादायक घटना घडली. 'समाधान दिवसा'अंतर्गत' जिल्हास्तरीय अधिकारी जनतेच्या तक्रारी ऐकत होते, तेव्हा लोढासा गावातील मेराज नावाच्या व्यक्तीने त्याच्या पत्नीवर केलेल्या आरोपाने सर्वांनाच मोठा धक्का बसला. मेराजने जिल्हा दंडाधिकारी अभिषेक यांच्यासमोर हजर होऊन तक्रार दाखल केली की, त्याची पत्नी रात्रीच्या वेळी सापामध्ये (नागीण) रूपांतरित होते आणि त्याला खूप घाबरवते, ज्यामुळे त्याला शांतपणे झोपताही येत नाही. हे ऐकून जिल्हा दंडाधिकारीही जागीच थिजले. या व्यक्तीची पत्नी रात्रीच्या वेळी सापाप्रमाणे फुसफुसत राहते, अशी तक्रार या व्यक्तीने केली.
हेही वाचा - Fraud Case: मुंबई पोलिसांकडून 60 कोटी रुपयांच्या फसवणुकीच्या प्रकरणात शिल्पा शेट्टीची 5 तास चौकशी
पत्नीवर मानसिक आरोग्याच्या समस्येचा आरोप
मेराज याने राजपूर येथील नसीमुनशी लग्न केले होते. त्याने आपल्या तक्रारीत दावा केला की, त्याची पत्नी मानसिकदृष्ट्या अस्वस्थ (Mentally Unstable) आहे. "तिच्या पालकांना हे सर्व माहीत असूनही त्यांनी मला तिच्याशी लग्न करण्यास भाग पाडले आणि माझे आयुष्य उद्ध्वस्त केले," असे मेराजने अधिकाऱ्यांना सांगितले. अत्यंत अशक्य वाटणाऱ्या या गोष्टींबद्दलची तक्रार ऐकून तिथे उपस्थित असलेले अधिकारीही चक्रावून गेले. अधिकाऱ्यांनी या तक्रारीची दखल घेत, कोतवाली पोलिसांना (Police) हे प्रकरण तपासासाठी आणि योग्य तोडगा काढण्यासाठी निर्देश दिले आहेत.
हेही वाचा - Shocking Crime : डोक्यात गेला.. विषय संपला! लग्नाला नकार देणाऱ्या प्रियकराची गर्भवती प्रेयसीने केली निर्घृण हत्या