Sharran Srivatsaa : ‘..त्याने माझ्या गळ्यावर चाकू टेकवला; मी त्याच्याशी डील केली.. तो म्हणाला, विचित्र माणूस!’ शरण श्रीवत्स यांची थरारक स्टोरी

अमेरिकेतील पहिल्याच दिवशी एका अज्ञात व्यक्तीने त्यांच्या गळ्यावर चाकू टेकवला आणि त्यांच्याकडील सर्व पैशांची मागणी केली. अशा भीतीदायक परिस्थितीत शरण यांनी लुटारूशी वाटाघाटी करण्याचे ठरवले.

Sharran Srivatsaa : ‘..त्याने माझ्या गळ्यावर चाकू टेकवला; मी त्याच्याशी डील केली.. तो म्हणाला, विचित्र माणूस!’ शरण श्रीवत्स यांची थरारक स्टोरी

Indian Origin Executive Sharran Srivatsaa : भारतीय वंशाचे कार्यकारी अधिकारी शरण श्रीवत्स यांनी अलीकडेच त्यांच्या आयुष्यातील एक थक्क करणारा प्रसंग सोशल मीडियावर शेअर केला आहे. ही गोष्ट त्यांच्या अमेरिकेतील वास्तव्याच्या पहिल्याच दिवसाची आहे, जेव्हा त्यांना एका धक्कादायक जीवघेण्या प्रसंगाला सामोरे जावे लागले होते.

चाकूची भीती असतानाही केले ‘निगोशिएशन’! 
साधारण 18 वर्षांचे असताना शरण श्रीवास्तव पहिल्यांदा अमेरिकेत पोहोचले होते. त्यावेळी त्यांच्याकडे केवळ 100 डॉलर्स होते आणि ते पूर्णपणे एकटे होते. अमेरिकेतील त्यांच्या पहिल्याच दिवशी एका अज्ञात व्यक्तीने त्यांच्या गळ्यावर चाकू टेकवला आणि त्यांच्याकडील सर्व पैसे देण्याची मागणी केली. अशा भीतीदायक परिस्थितीत कोणताही सामान्य माणूस घाबरला असता, पण शरण यांनी त्या लुटारूशी चक्क संवाद साधण्याचे आणि वाटाघाटी (Negotiation) करण्याचे ठरवले.

लुटारूला दिली सहसंवेदनेची (Empathy) जाणीव
शरण यांनी त्या लुटारूला सांगितले की, “मला खात्री आहे की तुला मला किंवा कोणा दुसऱ्याला इजा पोहोचवायची नाहीये. कदाचित तुझी सध्याची परिस्थिती खराब असावी.” त्यांनी लुटारूला धमकावण्याऐवजी त्याच्याबद्दल सहानुभूती दाखवली. त्यानंतर त्यांनी एक धाडसी प्रस्ताव समोर ठेवला. त्यांनी सांगितले की, “मी तुम्हाला माझे 100 डॉलर्स देतो, पण त्या बदल्यात तू मला 50 डॉलर्स परत दे. यामुळे मला माझ्या शाळेत पोहोचता येईल आणि तुलाही लुटालुटीच्या गुन्ह्यासाठी तुरुंगात जावे लागणार नाही.”

हेही वाचा – Gaganyaan Mission : गगनयान मोहिमेसाठी ड्रोग पॅराशूट चाचणी यशस्वी; ISRO चा महत्त्वपूर्ण टप्पा पार, पहा व्हिडिओ

लुटारूही पडला पेचात!
शरण यांचा हा विचित्र पण तर्कसंगत प्रस्ताव ऐकून तो लुटारू चकित झाला. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, त्याने शरण यांचा प्रस्ताव स्वीकारला. त्याने 100 डॉलर्सची नोट घेतली आणि आपल्या खिशातून दोन चुरगळलेल्या 20 च्या आणि एक 5 ची नोट, असे एकूण 50 डॉलर्स शरण यांना परत केले. पैसे परत करताना तो लुटारू म्हणाला, “आजवर मी ज्यांना लुटले, त्यामध्ये तू सर्वात जास्त विचित्र आणि वेगळा माणूस आहेस.” अशा प्रकारे शरण यांनी केवळ आपल्या शब्दांच्या जोरावर एका हिंसक परिस्थितीवर नियंत्रण मिळवले.

भीतीच्या क्षणी सहानुभूतीची ताकद
या प्रसंगातून शरण श्रीवत्स यांनी एक मोठा धडा जगाला दिला आहे. त्यांच्या मते, “जेव्हा आपण परिस्थितीपेक्षा माणसांना आधी पाहतो, तेव्हा कठीण प्रसंगातही मार्ग निघू शकतो.” समोरच्या व्यक्तीच्या मनात काय सुरू आहे, हे ओळखून त्याच्या विचारांना दिशा देणे महत्त्वाचे असते. “भीती वाटत असतानाही ‘सहानुभूती’ तुम्हाला एक वेगळी ताकद (Leverage) देते,” असे त्यांनी आपल्या पोस्टमध्ये नमूद केले आहे. जर तुम्ही समोरच्या व्यक्तीच्या नजरेतून जग पाहू शकलात, तर तुम्हाला स्वतःचे मत पटवून देण्यासाठी संघर्ष करावा लागणार नाही.

हेही वाचा – Readable Prescription Handwriting : आता डॉक्टरांना ‘सुवाच्य अक्षरात’ औषधांची नावे लिहावी लागणार; NMCचे वैद्यकीय महाविद्यालयांना कडक आदेश

सोशल मीडियावर कौतुकाचा वर्षाव
शरण श्रीवत्स यांची ही प्रेरणादायी गोष्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली आहे. एका नेटकऱ्याने लिहिले, “सहानुभूती नेहमीच भीती आणि तणावावर मात करण्यास मदत करते,” तर दुसऱ्याने म्हटले, “ही गोष्ट अत्यंत प्रेरणादायी आहे, कठीण काळात बुद्धीचा वापर कसा करावा याचे हे उत्तम उदाहरण आहे.” आव्हानात्मक परिस्थितीतही शांत राहून आणि माणुसकी जपून आपण संकटातून मार्ग काढू शकतो, हेच या गोष्टीतून अधोरेखित होते.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number