Arattai App: व्हॉट्सअॅपला टक्कर! भारताचे स्वदेशी मेसेजिंग अॅप अरत्ताई लाँच

चेन्नईस्थित झोहो कॉर्पोरेशनने विकसित केलेले हे अॅप दुर्गम आणि ग्रामीण भागात राहणाऱ्यांसाठीही फायदेशीर ठरेल. कंपनीचा दावा आहे की, येत्या काळात हे अॅप व्हॉट्सअॅपशी थेट स्पर्धा करेल.<br/>

Arattai App: व्हॉट्सअॅपला टक्कर! भारताचे स्वदेशी मेसेजिंग अॅप अरत्ताई लाँच

Arattai App: भारतीय सॉफ्टवेअर कंपनी झोहोने स्वदेशी मेसेजिंग अॅप अरत्ताई लाँच केले आहे. हे अॅप कमी इंटरनेट असलेल्या भागात आणि कमी किमतीच्या स्मार्टफोनवरही सुरळीतपणे काम करेल, असे कंपनीने सांगितले आहे. चेन्नईस्थित झोहो कॉर्पोरेशनने विकसित केलेले हे अॅप दुर्गम आणि ग्रामीण भागात राहणाऱ्यांसाठीही फायदेशीर ठरेल. कंपनीचा दावा आहे की, येत्या काळात हे अॅप व्हॉट्सअॅपशी थेट स्पर्धा करेल.

अरत्ताई अॅप लाँच झाल्यापासूनच चर्चेत आहे. भारतातील अॅप स्टोअरवरील नंबर वन सोशल नेटवर्किंग अॅप म्हणून याची लोकप्रियता झळकली आहे. केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर म्हटले की, अरत्ताई हे मोफत, वापरण्यास सोपे, सुरक्षित आणि ‘मेड इन इंडिया’ अॅप आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील स्वदेशी अॅप्स वापरण्याचे आवाहन केले आहे, ज्यावर प्रेरित होऊन मंत्री प्रधान यांनी नागरिकांना मित्र आणि कुटुंबाशी संपर्कात राहण्यासाठी मेड इन इंडिया अॅप्स वापरण्याचे आवाहन केले आहे.

हेही वाचा – Charging Tips: सावधान! मोबाईल नेहमी 100% चार्ज करता? या सवयीमुळे होऊ शकते मोठे नुकसान

अरत्ताई म्हणजे काय?

‘अरत्ताई’ हा तमिळ शब्द असून त्याचा अर्थ सामान्यतः गप्पा मारणे किंवा संवाद साधणे असा होतो. झोहोने विकसित केलेले हे अॅप चॅटिंग, फोटो-व्हिडिओ शेअरिंग, व्हॉइस नोट्स, ऑडिओ आणि व्हिडिओ कॉल यासारख्या सुविधा देते. अॅप सर्व वयोगटातील लोकांसाठी डिझाइन केले गेले असून, सुरक्षा आणि गोपनीयतेची काळजी यामध्ये घेतली गेली आहे.

हेही वाचा – AI Risks: लॅन्सेट जर्नलमध्ये धक्कादायक खुलासा! AI च्या वापरामुळे डॉक्टरांची कौशल्ये धोक्यात; सतत AI वर अवलंबून…

अरत्ताईची वैशिष्ट्ये

कमी बँडविड्थ ऑप्टिमायझेशन: स्लो इंटरनेट असतानाही अॅप सहज चालते.
लो मेमरी आणि बॅटरी वापर: कमी क्षमता असलेल्या स्मार्टफोनसाठी योग्य.
व्हॉइस आणि टेक्स्ट मेसेजिंग: ग्रुप चॅट, मीडिया आणि डॉक्युमेंट शेअरिंग.
ऑडिओ/व्हिडिओ कॉलिंग: मित्र आणि कुटुंबाशी सहज संपर्क.
मीटिंग्स आणि स्टोरीज: लोकेशन शेअरिंग, चॅनेल्स, आणि इतर सोशल वैशिष्ट्ये.

अरत्ताई कसे डाउनलोड करावे?

Apple App Store किंवा Google Play Store वर जा.
‘अरत्ताई’ अॅप शोधून डाउनलोड करा.
फोन नंबर वापरून खाते तयार करा.
नंतर नाव, डिस्प्ले पिक्चर, बायो आणि वापरकर्तानाव जोडून प्रोफाइल सेट करा.
आता तुमचे वापरकर्ता नाव मित्रांसोबत शेअर करून तुम्हाला त्यांच्याशी संपर्क साधता येईल. झोहोने लाँच केलेल्या अरत्ताई अॅपमुळे भारतात स्वदेशी मेसेजिंग अॅप्सच्या वाढत्या स्पर्धेचा प्रारंभ झाला आहे. 
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number