Instagram ने आणले Your Algorithm फीचर; Reels मध्ये दिसणार आता…

Instagram ने ‘Your Algorithm’ नावाचे नवे फीचर जाहीर केले असून वापरकर्ते आता Reels मध्ये दिसणाऱ्या कंटेंटवरील आवडी स्वतः व्यवस्थापित करू शकणार आहेत.

Instagram ने आणले Your Algorithm फीचर; Reels मध्ये दिसणार आता…

Instagram ने वापरकर्त्यांसाठी एक नवी उपयुक्त सुविधा जाहीर केली आहे. ‘Your Algorithm’ नावाच्या या फीचरमुळे वापरकर्त्यांना Reels टॅबमध्ये दिसणाऱ्या कंटेंटवर अधिक नियंत्रण मिळणार आहे. Instagram वापरकर्त्यांच्या आवडींनुसार काही विषय सुचवेल आणि त्यातील कोणता कंटेंट अधिक पाहायचा किंवा कोणता कमी पाहायचा हे वापरकर्ते स्वतः ठरवू शकतील.

Instagramचे प्रमुख Adam Mosseri यांनी सांगितले की Reels विभागाच्या वरच्या उजव्या कोपऱ्यात आता ‘Your Algorithm’ हा नवीन टॅब दिसेल. या टॅबमध्ये वापरकर्त्यांच्या Reels संबंधित आवडींचा एक छोटा सारांश असेल. हा सारांश पूर्णपणे AI generated असेल आणि अलीकडील user activity वर आधारित असेल. यामध्ये Painting, GRWM, Chess, Horror Movies यांसारखे विषय समाविष्ट असू शकतात.

हेही वाचा: Ambadas Danve On Relief Fund: अतिवृष्टी मदत निधीवरून वाद वाढला; दानवे यांच्या आरोपांचे CMO कार्यालयाकडून उत्तर

वापरकर्त्यांना त्यांचा हा आवडींचा सारांश स्वतःच्या followers सोबत share करण्याचाही पर्याय दिला जाईल. त्यामुळे Reels वर त्यांच्या पसंतीचे विषय इतरांनाही पाहता येतील. ही सुविधा आजपासून सर्वप्रथम U.S. मध्ये उपलब्ध होत आहे आणि लवकरच जगभरातील वापरकर्त्यांसाठीही सुरू केली जाईल.

महिनाभरापूर्वी Instagram ही सुविधा चाचणी स्वरूपात वापरत असल्याचे समोर आले होते. Mosseri यांनी सांगितले की पुढील टप्प्यात हेच फीचर Instagram च्या Explore विभागासाठीही उपलब्ध केले जाईल. या सुविधेमुळे Instagram वापरकर्त्यांना आपल्या आवडीनुसार प्लॅटफॉर्मवरील कंटेंट घडवण्याची संधी मिळणार असून Reels पाहण्याचा अनुभव अधिक वैयक्तिक, नियंत्रित आणि आनंददायी होईल. नवीन ‘Your Algorithm’ फीचर जागतिक स्तरावर लागू झाल्यानंतर Instagram वरील कंटेंट निवडीची पद्धत मोठ्या प्रमाणात बदलण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

हेही वाचा: E-cigarette Controversy: संसदेत खळबळ! अनुराग ठाकूर यांचा TMC खासदारावर ई-सिगारेट ओढल्याचा गंभीर आरोप

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number