मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनातील अंतिम आठवडा प्रस्तावावर भाषण करताना विविध मुद्यांवर भाष्य केलं. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील 90 लाख शेतकऱ्यांना दिलासा देणारी घोषणा केली आहे. नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आले आहेत.
केंद्र सरकार आणि राज्य सरकार मिळून आतापर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात दोन योजनांमधून 90 लाख शेतकऱ्यांच्या खात्यात 54 लाख कोटी रुपये जमा केले असल्याची माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.
हेही वाचा – Bus Accident: भयंकर! 40 प्रवाशांना घेऊन जाणारी बस नदीत बुडाली, दुर्घटनेत 23 जणांचा मृत्यू तर अनेक जण बेपत्ता
नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पीएम किसान सन्मान निधीचा 22 वा हप्ता वितरित करण्यात आला होता. केंद्राची ही मदत मिळाल्यापासून राज्यातील शेतकऱ्यांचे डोळे नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याकडे लागले होते.
आतापर्यंत या महत्त्वाकांक्षी योजनेचे आठ हप्ते यशस्वीरीत्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा झाले आहेत. शेतीसाठी लागणारी खते, बियाणे, मजुरी आणि इतर अनपेक्षित खर्च भागवण्यासाठी या हप्त्याचा मोठा आधार मिळतो. राज्य सरकारच्या या निर्णयामुळे राज्यातील कृषी क्षेत्रात आनंदाचे वातावरण पसरले असून, लाखो शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधानाचे हसू खुलले आहे.