CNG Price Hike : मुंबईकारांना धक्का! CNG – PNG च्या दरात 15 दिवसांत दुसऱ्यांदा वाढ; जाणून घ्या आजचे दर

आता पुन्हा एकदा सीएनजी आणि पीएनजीच्या दरात वाढ करण्यात आली आहे.

CNG Price Hike : मुंबईकारांना धक्का! CNG – PNG च्या दरात 15 दिवसांत दुसऱ्यांदा वाढ; जाणून घ्या आजचे दर

मुंबई : दरवाढीचं सत्र काही केल्या थांबेना. आता पुन्हा एकदा सीएनजी आणि पीएनजीच्या दरात वाढ करण्यात आली आहे. ही वाढ मुंबई शहरात झाली असून मुंबई आणि महानगरामध्ये सीएनजी 2 रुपयांनी महागला आहे. आता सीएनजीचा दर प्रतिकिलो 86 रुपयांवर पोहोचला असून पीएनजीमध्येही 50 पैशांची वाढ करण्यात झाली आहे. त्यामुळे हे दर आता प्रति युनिट 52 रुपयांवर पोहचले आहे. या दरवाढीमुळे रिक्षा, टॅक्सी आणि खासगी वाहनचालकांचे बजेट कोलमडणार आहेत. सोबतच वाहतूक खर्च वाढल्यानं सर्वसामान्यांच्या खिशालाही मोठी कात्री लागणार आहे.

हेही वाचा : Mumbai News : डॉक्टरांचा हलगर्जीपणा! प्रसूतीनंतर महिलेच्या पोटातच विसरले हँड ग्लोजसह बँडेजही; रुग्णालय प्रशासनाविरोधात तक्रार दाखल

दरम्यान, शनिवार, 30 मेपासून सीएनजी आणि पीएनजीची दरवाढ लागू होणार आहे. आजपासून संपूर्ण मुंबई आणि महानगर प्रदेशात (एमएमआर) कॉम्प्रेस्ड नॅचरल गॅस (सीएनजी) महाग होणार आहे. महानगर गॅस लिमिटेडने (एमजीएल) किरकोळ दरात 2 रुपये प्रति किलोने वाढ केली आहे. तर पाईपद्वारे मिळणाऱ्या स्वयंपाकाच्या गॅसच्या दरातही 50 पैसे प्रति युनिटने वाढ होणार आहे. या नवीन बदलामुळे मुंबई, ठाणे, नवी मुंबई आणि परिसरातील इतर भागांमध्ये सीएनजीचा दर 84 रुपये प्रति किलोवरून 86 रुपये प्रति किलो होणार आहे.  पाईपद्वारे मिळणाऱ्या गॅसचा दर 52 रुपये प्रति युनिटपर्यंत वाढणार आहे. 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number