NEET UG 2026 Exam Cancelled: नीट यूजी 2026 परीक्षा रद्द; पेपरफुटीनंतर NTA चा मोठा निर्णय, आता होणार फेरपरीक्षा

पेपरफुटीचे गंभीर आरोप आणि प्राथमिक तपासानंतर नॅशनल टेस्टिंग एजन्सीने (NTA) ही परीक्षा रद्द करण्याचा धाडसी निर्णय घेतला आहे.

NEET UG 2026 Exam Cancelled: नीट यूजी 2026 परीक्षा रद्द; पेपरफुटीनंतर NTA चा मोठा निर्णय, आता होणार फेरपरीक्षा

NEET UG 2026 Exam Cancelled: देशभरातील वैद्यकीय प्रवेशासाठी अत्यंत महत्त्वाची मानली जाणारी NEET UG 2026 परीक्षा अखेर रद्द करण्यात आली आहे. गेल्या 3 मे 2026 रोजी ही परीक्षा पार पडली होती. मात्र पेपरफुटीचे गंभीर आरोप आणि प्राथमिक तपासानंतर नॅशनल टेस्टिंग एजन्सीने (NTA) ही परीक्षा रद्द करण्याचा धाडसी निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारची अधिकृत मंजुरी मिळाल्यानंतर हा निर्णय जाहीर करण्यात आला असून, यामुळे लाखो विद्यार्थ्यांचे भवितव्य आता फेरपरीक्षेवर अवलंबून असणार आहे.

पारदर्शकतेसाठी फेरपरीक्षेचा निर्णय; नवीन तारखा लवकरच
NTA ने स्पष्ट केले आहे की, परीक्षा प्रक्रियेचा सखोल आढावा आणि तपास यंत्रणांकडून प्राप्त झालेल्या पुराव्यांच्या आधारे सध्याची परीक्षा प्रक्रिया ग्राह्य धरता येणार नाही. परीक्षेची विश्वासार्हता आणि पारदर्शकता जपण्यासाठी फेरपरीक्षा घेणे अनिवार्य असल्याचे संस्थेने म्हटले आहे. या फेरपरीक्षेसाठी नवीन तारखा आणि प्रवेशपत्रे (Admit Cards) लवकरच NTA च्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जातील. विद्यार्थ्यांचा वेळ आणि श्रम वाया जाऊ नये, यासाठी ही प्रक्रिया युद्धपातळीवर राबवली जाणार आहे.

NTA चं अधिकृत ट्विट- 

प्रकरणाचा तपास आता CBI कडे
या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन केंद्र सरकारने संपूर्ण प्रकरणाची चौकशी ‘केंद्रीय अन्वेषण विभाग’ (CBI) कडे सोपवली आहे. या गैरप्रकाराच्या मुळाशी जाण्यासाठी NTA कडून तपास यंत्रणांना सर्व आवश्यक कागदपत्रे आणि डिजिटल पुरावे उपलब्ध करून दिले जात आहेत. फेरपरीक्षेमुळे विद्यार्थ्यांच्या आणि पालकांच्या मनात असलेल्या असुरक्षिततेच्या भावनेबद्दल संस्थेने दिलगिरी व्यक्त केली आहे, परंतु गुणवत्तेशी तडजोड न करण्यासाठी हा निर्णय घेतला गेल्याचे स्पष्ट केले आहे.

हेही वाचा – NEET UG Paper Leak: नीट UG पेपर परीक्षेपूर्वीच फुटला? ‘गेस पेपर’मधील तब्बल 140 प्रश्न प्रश्नपत्रिकेशी जुळल्याने खळबळ

विद्यार्थ्यांना पुन्हा नोंदणीची गरज नाही; जुनेच केंद्र राहणार वैध
विद्यार्थ्यांसाठी दिलासादायक बाब म्हणजे, मे 2026 सत्रासाठी केलेली मूळ नोंदणी आणि उमेदवारांची माहिती फेरपरीक्षेसाठी ग्राह्य धरली जाईल. विद्यार्थ्यांना पुन्हा अर्ज करण्याची किंवा कोणतेही अतिरिक्त शुल्क भरण्याची आवश्यकता नाही. यापूर्वी भरलेले परीक्षा शुल्क परत केले जाणार असून फेरपरीक्षा पूर्णपणे मोफत असेल. तसेच विद्यार्थ्यांनी निवडलेली परीक्षा केंद्रे देखील शक्यतो तीच राहतील. उमेदवारांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता केवळ अधिकृत सूचनेनुसारच पुढील तयारी करावी, असे आवाहन NTA तर्फे करण्यात आले आहे.
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number