Thursday, November 13, 2025 02:37:18 PM

No Shave November Reason : सोशल मीडियावर 'नो शेव्ह नोव्हेंबर'चा ट्रेंड, जाणून घ्या इतिहास आणि कारण

वाढलेल्या दाढीचे फोटो हॅशटॅग आणि कॅप्शनसह व्हायरल होतात. गेल्या काही वर्षांपासून हा ट्रेंड भारतात मोठ्या प्रमाणात व्हायरल झालाय. पण या ट्रे़ंडचा उद्देश काय? आणि त्याचा इतिहास काय?

no shave november reason  सोशल मीडियावर नो शेव्ह नोव्हेंबरचा ट्रेंड जाणून घ्या इतिहास आणि कारण
No Shave November Reason

No Shave November Reason : नोव्हेंबर महिना सुरु झाला की सोशल मीडियावर एक ट्रेंड सुरु होतो तो म्हणजे नो शेव्ह नोव्हेंबर. वाढलेल्या दाढीचे फोटो हॅशटॅग आणि कॅप्शनसह व्हायरल होतात. गेल्या काही वर्षांपासून हा ट्रेंड भारतात मोठ्या प्रमाणात व्हायरल झालाय. पण या ट्रे़ंडचा उद्देश काय? आणि त्याचा इतिहास काय? 

सामाजिक उद्देशाने सुरु झालेला हा उपक्रम आता एका सणासारखा साजरा करतात. महाविद्यालयीन तरुणांपासून ते कॉपोरेट ऑफिसमध्ये हा ट्रेंड फॉलो केला जातो. अनेकांसाठी ही केवळ एक फॅशन किंवा आळशीपणातून मिळालेली सूट असते. केस कापणे, दाढी करणे असे प्रकार नोव्हेंबरच्या 30 दिवसांत केले जात नाहीत. पण या ट्रेंडचा मूळ उद्देश म्हणजे प्रोस्टेट कॅन्सरबाबत जनजागृती करणे. या ट्रेंडला पाठिंबा देणारे पुरुष दाढी किंवा केस कापत नाहीत, त्यातून साठवलेले पैसे या मोहिमेसाठी दान केले जातात. कॅन्सर प्रतिबंध, उपचार, संशोधन आणि शिक्षणासाठी कार्यरत असलेल्या संस्थांना या पैशांची मदत होते.

हे ही वाचा - Fridge Temperature Guide: हिवाळ्यात फ्रिज बंद करू नका! फक्त हे सेटिंग बदला आणि विजेची बचत करा

2009 साली अमेरिकेतील NGO मॅथ्यू हिल फाऊंडेशनने या ट्रेंडची सुरुवात केली. कॅन्सरशी लढताना मॅथ्यू हिल यांचं निधन झाल्याने श्रद्धांजली देण्यासाठी ही मोहीम राबवण्यास सुरुवात झाली. मॅथ्यू हिल फाउंडेशन कर्करोग प्रतिबंध, उपचार किंवा संशोधन आणि शिक्षण यासाठी काम करणाऱ्या संस्थांना हा निधी देते.सोशल मीडियाच्या माध्यमातून या मोहिमेला लोकप्रियता मिळाली.


सम्बन्धित सामग्री