Aadhar Card New Rules: आता आधार कार्डवर वडिलांचे किंवा पतीचे नाव दिसणार नाही; 1 ऑक्टोबरपासून लागू होणार UIDAI चे ‘हे’ 5 नवीन नियम

भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाने (UIDAI) यासंबंधी 5 नवीन नियम जारी केले आहेत, जे 1 ऑक्टोबरपासून लागू होतील.<br/>

Aadhar Card New Rules: आता आधार कार्डवर वडिलांचे किंवा पतीचे नाव दिसणार नाही; 1 ऑक्टोबरपासून लागू होणार UIDAI चे ‘हे’ 5 नवीन नियम

Aadhar Card New Rule: पुढील महिन्यापासून आधार कार्ड संदर्भातील अनेक नियम बदलणार आहेत. 1 ऑक्टोबर 2025 पासून, तुमचे 10 वर्षे जुने आधार कार्ड अपडेट करणे अनिवार्य असेल. भारतीय नागरिकत्व सिद्ध करण्यासाठी आधार कार्ड आवश्यक आहे. लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत प्रत्येकासाठी आधार कार्ड असणे अनिवार्य आहे. अलीकडेच, भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाने (UIDAI) यासंबंधी 5 नवीन नियम जारी केले आहेत, जे 1 ऑक्टोबरपासून लागू होतील.

यामध्ये जुने कार्ड अपडेट करणे आणि नवीन कार्डमधून वडिलांचे किंवा पतीचे नाव काढून टाकणे यासारखे बदल समाविष्ट आहेत. त्यामुळे, जर तुम्हाला तुमच्या आधार कार्डमध्ये कोणतेही बदल करायचे असतील तर कृपया 30 सप्टेंबरपर्यंत करून घ्या. हे बदल केवळ अपडेट प्रक्रियेवर आणि शुल्कावर परिणाम करणार नाहीत, तर तुमच्या आधार कार्डवर प्रदर्शित होणारी काही माहिती देखील बदलतील.

आधार अपडेटसाठी नवीन शुल्क

दरम्या, 1 ऑक्टोबर 2025 पासून, तुमच्या आधार कार्डमधील नाव किंवा पत्ता यासारख्या सामान्य दुरुस्त्यांसाठी 75 शुल्क आकारले जाईल. जर तुम्हाला तुमची बायोमेट्रिक माहिती, जसे की बोटांचे ठसे किंवा फोटो बदलायचे असतील, तर तुम्हाला 125 रुपये द्यावे लागेल. तथापि, नवीन आधार कार्ड बनवण्यासाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. ते पूर्वीसारखेच मोफत राहील.

मुले आणि किशोरवयीन मुलांसाठी बायोमेट्रिक अपडेट

तथापी, 5 ते 7 वर्षे वयोगटातील मुलांना आणि 15 ते 17 वर्षे वयोगटातील किशोरांना बायोमेट्रिक अपडेटसाठी आता कोणतेही शुल्क भरावे लागणार नाही. पूर्वी, हे शुल्क 50 रुपये होते, परंतु आता ते माफ करण्यात आले आहे. तथापि, या वयोगटांसाठी बायोमेट्रिक अपडेट अनिवार्य आहेत. वेळेवर केले नाही तर त्यांचे आधार कार्ड अवैध होऊ शकते.

हेही वाचा – RBI NEW INTEREST RATE: RBI दरकपात करेल का? अर्थतज्ज्ञांचे संकेत, गुंतवणूकदारांचे लक्ष बुधवारच्या बैठकीकडे

पती किंवा वडिलांचे नाव दिसणार नाही

याशिवाय, 15 ऑक्टोबर 2025 पासून, 18 वर्षे आणि त्यावरील वयाच्या व्यक्ती यांच्या नवीन आधार कार्डवर वडिलांचे किंवा पतीचे नाव दिसणार नाही. ही माहिती फक्त UIDAI रेकॉर्डमध्ये राहील. या बदलामुळे वारंवार नाव बदलण्याची गरज नाहीशी होईल आणि लोकांची गोपनीयता जपली जाईल, विशेषतः महिलांसाठी हे एक महत्त्वाचे पाऊल आहे.

हेही वाचा – Saving Scheme Interest Rate Cuts: PPF, NSC आणि इतर बचत योजनांवर व्याजदर घटणार?; गुंतवणूकदारांसाठी सरकारचा मोठा निर्णय लवकरच

जन्मतारखेतील बदल

आता, तुमची जन्मतारीख तुमच्या आधार कार्डवर फक्त वर्ष (उदा. 1990) म्हणून दिसेल, तर संपूर्ण जन्मतारीख (उदा. 01/01/1990) UIDAI रेकॉर्डमध्ये राहील. आता तुमच्या आधार कार्डवर फक्त तुमचे नाव, वय आणि पत्ता दिसेल.

पत्ता अपडेटसाठी नवीन कागदपत्रे

1 ऑक्टोबर 2025 पासून, अपडेट प्रक्रिया पूर्णपणे डिजिटल होईल. याचा अर्थ तुम्ही UIDAI वेबसाइट (uidai.gov.in) किंवा mAadhaar अॅप वर विनंती सबमिट करू शकता आणि जवळच्या आधार केंद्रावर तुमची कागदपत्रे पडताळून पाहू शकता. त्यानंतर अपडेट ऑनलाइन पूर्ण होईल.
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number