Thursday, January 22, 2026 03:07:23 AM

Job Opportunity: केवळ मुलाखत द्या आणि सरकारी नोकरी मिळवा; या क्षेत्रातील तरुणांसाठी मोठी सुवर्णसंधी

10 नोव्हेंबर ते 24 नोव्हेंबर 2025 या कालावधीत सकाळी 10 ते दुपारी 3 या वेळेत PCMC मुख्य इमारतीत मुलाखती होणार आहेत.

job opportunity केवळ मुलाखत द्या आणि सरकारी नोकरी मिळवा या क्षेत्रातील तरुणांसाठी मोठी सुवर्णसंधी

पिंपरी चिंचवड: सरकारी नोकरीची संधी शोधणाऱ्या तरुणांसाठी महत्त्वाची माहिती समोर आली आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने (Pimpri Chinchwad Municipal Corporation) 2025 साठी वैद्यकीय विभागातील पदांची भरती जाहीर केली असून ही भरती थेट मुलाखतीद्वारे करण्यात येणार आहे. लिखित परीक्षा नसल्यामुळे पात्र उमेदवारांसाठी ही एक जलद आणि सोपी संधी ठरणार आहे. सरकारी नोकरीचे आकर्षण, स्थिरता आणि वैद्यकीय क्षेत्रातील अनुभव मोलाचा मानला जात असल्याने अनेक उमेदवार या भरतीकडे उत्सुकतेने पाहत आहेत. महापालिकेकडून ‘इंटेन्सिव्हिस्ट’ या पदासाठी एकूण 11 रिक्त जागांची घोषणा करण्यात आली आहे. ही भरती कंत्राटी पद्धतीने होणार असली तरी सरकारी यंत्रणेत काम करण्याची संधी मिळणे हे स्वतःमध्ये मोठे व्यावसायिक मूल्य आहे.

वैद्यकीय क्षेत्रात काम करणाऱ्या उमेदवारांसाठी ही पदे विशेषतः आकर्षक असून Intensive Care Unit (ICU) विभागात अनुभव वाढवू इच्छिणाऱ्यांसाठी ही उत्तम संधी आहे. सदर पदांसाठी उमेदवारांकडे Doctor of Medicine (MD) किंवा Diplomate of National Board (DNB) पदवी असणे आवश्यक आहे. तसेच Pharmacology, Chest Disease किंवा Intensive Care या विषयांमध्ये डिप्लोमा असलेले उमेदवारही पात्र ठरतील. संबंधित क्षेत्रातील अनुभव असणाऱ्यांना निवड प्रक्रियेत महत्व दिले जाईल. या पदांसाठी कमाल वयोमर्यादा 58 वर्षे तरवण्यात आली आहे, त्यामुळे अनुभवी डॉक्टरांसाठीही या भरतीत मोठी संधी खुली आहे.

हेही वाचा: RK Singh Suspended: माजी केंद्रीय मंत्री आर.के. सिंह भाजपमधून 6 वर्षांसाठी निलंबित; 'या' कारणामुळे करण्यात आली कारवाई

निवड झालेल्या उमेदवारांचा पगार त्यांच्या शैक्षणिक पात्रता, अनुभव व कौशल्यांच्या आधारे निश्चित केला जाणार आहे. अनुभव, जबाबदारी आणि कौशल्य यानुसार पगाराची रचना आकर्षक असेल, असे महापालिकेने स्पष्ट केले आहे. महापालिकेच्या Intensive Care Unit (ICU) विभागात काम करण्यासाठी या भरतीच्या माध्यमातून पात्र डॉक्टरांची निवड केली जाणार आहे. या भरतीसाठी कोणतीही लेखी परीक्षा घेतली जाणार नसून 10 नोव्हेंबर ते 24 नोव्हेंबर 2025 या कालावधीत सकाळी 10:00 ते दुपारी 3:00 या वेळेत थेट मुलाखती आयोजित केल्या आहेत. उमेदवारांनी वेळेपूर्वी उपस्थित राहून सर्व आवश्यक कागदपत्रांची मूळ आणि झेरॉक्स प्रत सोबत आणावी. यामध्ये बायोडाटा, शैक्षणिक प्रमाणपत्रे, अनुभवाची कागदपत्रे आणि ओळखपत्रांचा समावेश आहे. मुलाखत आरोग्य वैद्यकीय अधिकारी यांचे कार्यालय, दुसरा मजला, वैद्यकीय विभाग, पिंपरी चिंचवड महानगरपालिका मुख्य इमारत याठिकाणी आहे.

उमेदवारांना निश्चित तारखेत या ठिकाणी उपस्थित राहणे बंधनकारक आहे. दस्तऐवजांची तपासणी आणि मुलाखत प्रक्रियेच्या आधारेच उमेदवारांची निवड केली जाईल. वैद्यकीय क्षेत्रात काम करण्याचे स्वप्न पाहणाऱ्यांसाठी, Intensive Care Unit (ICU) सारख्या महत्त्वाच्या विभागात कौशल्य विकसित करू इच्छिणाऱ्या आणि सरकारी नोकरीचे स्वप्न पाहणाऱ्या उमेदवारांसाठी Pimpri Chinchwad Municipal Corporation ची ही भरती एक सुवर्णसंधी आहे. अनुभव, पात्रता आणि थेट मुलाखतीच्या माध्यमातून सरकारी पद मिळवण्याची संधी कमी वेळा उपलब्ध होते. त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी दिलेल्या तारखेत उपस्थित राहून या संधीचा फायदा घ्यावा.

हेही वाचा: Donald Trump: ट्रम्प यांनी हटवले बीफ-कॉफी-फळांवरील टॅरिफ; महागाईच्या दबावामुळे मोठा निर्णय

 

सम्बन्धित सामग्री