Post Recruitment 2026: इंडिया पोस्ट (India Post) अंतर्गत बंगळुरू येथील 'मेल मोटर सर्व्हिस' (MMS) विभागाद्वारे 'स्टाफ कार ड्रायव्हर' (ऑर्डिनरी ग्रेड) या पदासाठी भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. प्रतिनियुक्ती किंवा शोषक (Deputation/Absorption) तत्त्वावर एकूण 11 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. यासाठी इच्छुक उमेदवारांकडून ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. निवड झालेल्या उमेदवारांना 7 व्या वेतन आयोगानुसार 'पे लेव्हल-2' मध्ये 19,900 रुपये ते 63,200 रुपये प्रतिमहिना वेतन आणि इतर शासकीय भत्ते दिले जातील.
पात्रता, अनुभव आणि वयोमर्यादा
या पदासाठी अर्ज करणारा उमेदवार मान्यताप्राप्त शिक्षण मंडळाकडून 10 वी उत्तीर्ण असावा. तसेच त्याच्याकडे हलकी (LMV) व जड (HMV) वाहने चालवण्याचा वैध परवाना (ड्रायव्हिंग लायसन्स) आणि किमान 3 वर्षांचा वाहन चालवण्याचा अनुभव असणे अनिवार्य आहे. वाहनातील किरकोळ तांत्रिक बिघाड दुरुस्त करण्याचे ज्ञान असणे आवश्यक असून अर्जदाराचे कमाल वय 56 वर्षांपेक्षा जास्त नसावे. ही भरती प्रामुख्याने सध्या सेवेत असलेल्या केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांसाठी असून, यामध्ये टपाल विभागातील डिस्पॅच रायडर आणि एमटीएस (MTS) कर्मचाऱ्यांना प्राधान्य दिले जाईल.
हेही वाचा – Maharashtra Government: Gen Z साठी मोठी खुशखबर! राज्यभर 1,000 रोजगार मेळावे; सरकारचे 9 मोठे निर्णय
अर्ज प्रक्रिया आणि अंतिम मुदत
उमेदवारांना अधिकृत संकेतस्थळावरून अर्जाचा नमुना डाऊनलोड करून तो पूर्ण भरावा लागेल. अर्जासोबत सर्व आवश्यक शैक्षणिक प्रमाणपत्रे, ड्रायव्हिंग लायसन्स व वयाच्या पुराव्याची स्वाक्षरीत (Self-attested) सत्यप्रत जोडून अर्ज 'मॅनेजर, मेल मोटर सर्व्हिस, बंगळुरू – 560001' या पत्यावर पाठवायचा आहे. जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून 60 दिवसांच्या आत ऑफलाईन अर्ज दिलेल्या पत्यावर पोहोचणे आवश्यक आहे.