RBI Repo Rate: रेपो दरातील कपातीचा कर्जदारांना होणार मोठा लाभ; गृहकर्ज-वाहन कर्जावरील EMI 5 वर्ष आधीचं संपणार

हा दर कमी झाला की बँकांचा कर्जखर्च घटतो आणि त्याचा थेट फायदा गृहकर्ज व वाहन कर्ज घेणाऱ्या ग्राहकांना होतो. त्यामुळे आगामी महिन्यांत कर्जाचे हप्ते लक्षणीयरीत्या कमी होणार आहेत.<br/>

RBI Repo Rate: रेपो दरातील कपातीचा कर्जदारांना होणार मोठा लाभ; गृहकर्ज-वाहन कर्जावरील EMI 5 वर्ष आधीचं संपणार

RBI Repo Rate: देशातील कर्जदारांसाठी मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे. रिझर्व्ह बँकेने रेपो दरात 0.25 टक्क्यांची घट जाहीर करताच होम लोन आणि ऑटो लोनचे EMI कमी होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. पतधोरण समितीच्या ताज्या बैठकीनंतर RBI गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी 5 डिसेंबर रोजी ही महत्त्वपूर्ण घोषणा केली. RBI ज्या व्याजदराने विविध बँकांना निधी उपलब्ध करून देते, त्यालाच रेपो दर म्हणतात. हा दर कमी झाला की बँकांचा कर्जखर्च घटतो आणि त्याचा थेट फायदा गृहकर्ज व वाहन कर्ज घेणाऱ्या ग्राहकांना होतो. त्यामुळे आगामी महिन्यांत कर्जाचे हप्ते लक्षणीयरीत्या कमी होणार आहेत.

हेही वाचा – Income Tax Refund : टॅक्स रिफंड अजून मिळाला नाही? रिटर्न भरल्यानंतरही पैसे मिळण्यात येऊ शकतात 'या' अडचणी

ग्राहकांची किती बचत होणार?

नवीन रेपो दरामुळे 20 वर्षांच्या मुदतीसाठी विविध कर्जांवर खालीलप्रमाणे EMI कमी होतील:

20 लाख कर्ज – दरमहा अंदाजे 310 बचत
25 लाख कर्ज – जवळपास 394 बचत
30 लाख कर्ज – सुमारे 465 बचत
50 लाख कर्ज – प्रतिमाह तब्बल 788 बचत

तज्ज्ञांच्या मते, ग्राहकांनी ही वाचणारी रक्कम दरवर्षी एक ‘अतिरिक्त EMI’ म्हणून भरली तर 20 वर्षांचे कर्ज 15 वर्षांतच फेडणे शक्य होईल.

हेही वाचा – Avadhut Sathe: अवधूत साठेंवर SEBI ची मोठी कारवाई! 546.16 कोटी बेकायदेशीर कमाई जप्त करण्याचे आदेश

या वर्षात रेपो दरात सलग कपात

चालू वर्षात RBI ने आतापर्यंत एकूण 1.25 टक्के रेपो दरात कपात केली आहे. फेब्रुवारी ते जून या काळात एकूण 1 टक्के कपात करण्यात आली. तथापी, ऑगस्ट आणि ऑक्टोबरमध्ये दर स्थिर ठेवण्यात आले. आता डिसेंबरमध्ये आणखी 0.25 टक्के घट करण्यात आली. यामुळे रेपो दर 5.5 टक्क्यांवरून 5.25 टक्के इतका खाली आला आहे. पुढील पतधोरण बैठकीतही दर कमी होण्याची शक्यता तज्ञ व्यक्त करत आहेत.
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number