काकीच्या प्रेमात वेडापिसा! गरोदरपणात केलं अमानुष कृत्य; एवढ्यावरच थांबला नाही, चित्रपट पाहून पुतण्याने….

Shocking Incident : एका 22 वर्षीय तरुणाने आपल्याच 8 महिन्यांच्या गरोदर लिव्ह-इन पार्टनरची गळा आवळून हत्या केली आहे. हत्येनंतर तो इथंच थांबला नाही तर त्याने जे केलं ते अतिशय हादरवणार होतं.
काकीच्या प्रेमात वेडापिसा! गरोदरपणात केलं अमानुष कृत्य; एवढ्यावरच थांबला नाही, चित्रपट पाहून पुतण्याने….
चित्रपट पाहून पुढे जे केलं ते हादरवणारं

Crime News : जयूपरच्या बिंदायका भागातून अतिशय धक्कादायक उघडकीस आलेली आहे. एका 22 वर्षीय तरुणाने आपल्याच 8 महिन्यांच्या गरोदर लिव्ह-इन पार्टनरची गळा आवळून हत्या केली आहे. हत्येनंतर तो इथंच थांबला नाही तर तिचा मृतदेह राहत्या घराच्या अंगणात खड्डा करुन पुरला आणि घटनास्थळावरुन पळ काढला. किरण (वय32) असे मृत महिलेचे नाव असून आरोपीचं नावं प्रवेश रावत असल्याचं समोर येत आहे. खरं तर त्यांचे हे नातं फक्त लिव्ह-इन पार्टनरपर्यंत मर्यादित नव्हतं. पोलिस तपासात समोर आलेल्या माहितीने सर्वजण पूर्णपणे हादरुन गेले आहेत.

समोर आलं खरं नातं
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी प्रवेश रावत हा मृत महिला अर्थात किरणाचा पुतण्या होता.मात्र, गेल्या काही महिन्यांपासून ते नात्यात होते आणि जयपूरमध्ये एकत्र राहत होते. साधारण जानेवारी महिन्यात प्रवेश हा किरणला तिच्या घरातून घेऊन आला होता आणि ती गर्भवती राहिल्यापासून तोच तिची काळजी घेत होता. विशेष म्हणजे दोघांकडे एकच मोबाईल फोन होता,जो प्रवेश हा कामावर जाताना मोबाईल किरणकडे देऊन जायचा.

हेही वाचा-हॉटेलच्या खोलीत महिलेचा संशयास्पद मृत्यू; मध्यरात्रीच्या वादानंतर जोडीदार फरार, पडद्याच्या रॉडने वाढवला संशय

मात्र, काही दिवसांपासून किरण ही फोनवर इतर कोणाशी तर बोलत असल्याचा त्याला संशय आला आणि त्यावरुनच दोघांमध्ये वाद होऊ लागले. 23 सप्टेंबरच्या सकाळी देखील याच कारणावरुन दोघांमध्ये वाद वाढत गेला आणि प्रवेशने तिची गळा आवळून हत्या केली.

चित्रपट पाहून केलं पुढील कृत्य
प्रवेशने हत्येनंतर मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी गुन्हेगारी आधारित चित्रपट पाहिला आणि पुढील कट रचला. त्याने घरासमोरच खड्डा खोदून किरणचा मृतदेह त्याच पुरला आणि मृतदेह लवकर कुजावा यासाठी साधारण त्यावर 2 किलो मीठ टाकले. हत्येच्या दुसऱ्या दिवशी त्याने घराला कुलून लावून मंदिरात दर्शन घेण्यासाठी गेला. एवढंच नाही तर कोणालाही आपल्याबाबत संशय येऊ नये म्हणून तो 25,26 सप्टेंबर रोजी कारखान्यात कामावरही गेला. शेवटी 26 सप्टेंबरच्या रात्री त्याने आपल्या घरच्यांना किरणच्या मृत्यूची माहिती दिली आणि मोबाईल फोन बंद करुन जयपूरमधून पळून गेला.

हेही वाचा-पालघरमध्ये थरारक घटना! प्रेमप्रकरणातून अल्पवयीन तरुणाचा टोकाचा निर्णय; पोलिसांमुळे वाचला जीव

या घटनेची माहिती पोलिसांना कळताच त्यांनी तातडीने तपास सुरु केला. याच तपासादरम्यान पोलिसांनी प्रवेशचा फोन हा सुरु झाल्याचे कळाले आणि त्या उत्तर प्रदेश सीमेजवळून ताब्यात घेतले. सुरुवातील आरोपीने किरणने आत्महत्या केल्याचा आणि त्याच भीतीने मृतदेह पुरल्याचा बनवा रचण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी खाक्या दाखवताच त्याने केलेल्या हत्येची अखेर कबुली दिली. बिंदायका पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेला असून, या घटनेमागील नेमका हेतू आणि घटनाक्रम स्पष्ट करण्यासाठी पोलीस आरोपीची कसून चौकशी करत आहेत.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version