Human Washing Machine: बाजारात आले माणसांना आंघोळ घालणारे अनोखे वॉशिंग मशीन; 15 मिनिटांत पूर्ण शरीर स्वच्छ

टेक कंपनी सायन्स (Science) ने विकसित केलेले हे मशीन ओसाका वर्ल्ड एक्स्पोमध्ये प्रदर्शित झाल्यानंतर सर्वत्र चर्चेत आले आहे.<br/>

Human Washing Machine: बाजारात आले माणसांना आंघोळ घालणारे अनोखे वॉशिंग मशीन; 15 मिनिटांत पूर्ण शरीर स्वच्छ

Human Washing Machine: जपानमध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानाची आणखी एक कमाल पाहायला मिळत आहे. मानवांना आंघोळ घालणारे 'नेक्स्ट जनरेशन ह्युमन वॉशिंग मशीन' आता अधिकृतपणे जपानी बाजारात उपलब्ध झाले आहे. टेक कंपनी सायन्स (Science) ने विकसित केलेले हे मशीन ओसाका वर्ल्ड एक्स्पोमध्ये प्रदर्शित झाल्यानंतर सर्वत्र चर्चेत आले आहे. कॅप्सूलसारख्या आकाराच्या या मशीनमध्ये वापरकर्त्यांनी झोपायचे, झाकण बंद करायचे आणि नंतर मशीन मायक्रोबबल्स व फाइन मिस्ट शॉवरचा वापर करून संपूर्ण शरीर स्वच्छ करते. ही प्रक्रिया सुमारे 15 मिनिटांत पूर्ण होते. त्यात रिलॅक्सिंग संगीत, दृश्ये आणि हृदयाचे ठोके तपासणारे विशेष सेन्सर्सही बसवले आहेत. त्यामुळे हे फक्त शरीरच नाही तर 'मन आणि आत्मा ताजेतवाने करणारे' मशीन असल्याचा दावा कंपनीने केला आहे.

हेही वाचा – Strange Theft : चोराने 17 लाखांचे 60 हिरे आणि 15 नीलम जडवलेले अंडे गिळल्याचा आरोप; कुठे घडला हा चोरीचा अनोखा प्रकार

ओसाकातील एका हॉटेलने हे मशीन खरेदी केले असून पाहुण्यांना हा विशेष अनुभव देण्याची तयारी सुरू आहे. प्रसिद्ध इलेक्ट्रॉनिक्स रिटेलर यामादा डेन्कीनेही हे मशीन त्यांच्या स्टोअर्समध्ये लोकांना प्रत्यक्ष अनुभवण्यासाठी डेमो म्हणून आणले आहे. सायन्स कंपनीने सांगितले की, अनोखे तंत्रज्ञान आणि जटिल डिझाइनमुळे फक्त 50 युनिट्स तयार करण्यात येणार असून प्रत्येक युनिटची किंमत 60 दशलक्ष येन (भारतात अंदाजे 3.47 कोटी) असेल.

हेही वाचा – कंपनीच्या प्रॉफिटमध्ये मोठा वाटा, मालकाकडून 1000 कर्मचाऱ्यांना मोफत लंडनवारी

दरम्यान, या मशीनबद्दल सोशल मीडियावरही जोरदार चर्चा सुरू आहे. व्हिडिओ पाहून कुणी याला कार धुण्यासाठी वापरता येईल असा विनोद केला, तर कुणी हे अपंग व्यक्तींसाठी खूप उपयोगी ठरेल असं म्हटलं. काहींनी मात्र बादली आणि मगच सर्वात किफायतशीर असल्याच्या मजेशीर प्रतिक्रिया नोंदवल्या.  
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number